औरंगाबाद दि . बहुजन जनता दल व युवा आघाडी.वैद्यकीय कामगार आघाडी.महिला आघाडी. यांच्या संयुक्त विद्यमाने बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त राज्यातील अनेक जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागामध्ये सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
रत्नागिरी कोल्हापूर सातारा पुणे औरंगाबाद जालना नागपूर बुलढाणा जिल्ह्यासह अनेक शहरी व ग्रामीण भागात भोजनदान.रुग्णाना फळ वाटत. रस्त्यावर वास्तव करणाऱ्या गरजू नागरिकांना ब्लॅंकेट वाटप. महिलांना साडी व लुगडे वाटप. सामाजिक कार्यक्रम. भिम बुद्ध गीत कार्यक्रमाचे आयोजन.महिलांना वाण व तिळगुळाचे वाटप. अपंग व वृद्ध नागरिकांना लाल काठीचे वाटप. चष्मे वाटप.सह अनेक सामाजिक कार्यक्रम राबवुन बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांचा वाढदिवस राज्यात सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करून साजरा करण्यात आला.
बहुजन जनता दल कडून पंडित भाऊ दाभाडे संस्थापक अध्यक्ष बहुजन जनता दल यांच्या वाढदिवसानिमित्तचा सप्ताह समारोप कार्यक्रम बाबा पेट्रोल पंप चौक बस स्टँड रोड औरंगाबाद येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाचे आयोजन बहुजन जनता दल औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष शांताराम गावंडे पाटील यांनी केले होते. यावेळी बहुजन जनता दलाचे औरंगाबाद शहराध्यक्ष फैजल सय्यद. बहुजन जनता दल मराठवाडा अध्यक्ष किशोर दास पारलिंगे. बहुजन जनता दल औरंगाबाद जिल्हाध्यक्षा महिला आघाडी रेश्मा सोनावणे. बहुजन जनता दल वडूज शहर अध्यक्ष नितीन भोसले. यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बहुजन जनता दल पैठण शहर अध्यक्ष हिरालाल गोसावी यांनी केले तर आभार प्रदर्शन अजिंठा वेरूळ शहराध्यक्ष दीपक चौधरी यांनी केले यावेळी सुभाष इंगळे धनराज पाटील किशोर राऊत कमलाबाई ओगले संगिता भुरे वच्छला शेळके ज्योती लांजेवार प्रिया जाधव हिम्मत पाटील रोहित लांडगे राजेश जानकर प्रा भाऊसाहेब शिंदे दादासाहेब तरडे छबुताई तायडे मिना खांडेकर सुनिता राऊत सुनील पाटील आनंद गजभिये महेंद्र इंगळे यांच्यासह बहुजन जनता दल व युवा आघाडी महिला आघाडी वैद्यकीय कामगारासाठी यांचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते