म.रा.माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नागपुर यांचे अंतर्गत घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षेचा निकाल नुकताच जाहिर झाला असुन स्थानिक हिंदू ज्ञान मंदिर , ब्रम्हपुरी चा निकाल १००% टक्के लागलेला आहे.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी उत्कृष्ठ निकालाची परंपरा विद्यालयाने कायम राखली आहे.
विद्यालयातुन कु. अनुष्का शशिकांत सोनुने हिने ९३.०० टक्के गुण घेवुन विद्यालयातुन प्रथम येण्याचा मान मिळविला आहे तर तन्मय मनोज सहारे याने ९०.२०टक्के गुण घेवुन द्वितिय तर कु. तन्मयी धनराज खोब्रागडे हिने ८९.८० टक्के गुण घेऊन तृतिय येण्याचा मान मिळविला आहे.
प्राविण्य प्राप्त व सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे त्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब कहारे, सचिव प्रबीरराव चौरीकर सर्व पदाधिकारी, विद्यालयाचे मुख्याध्यापिका सय्यद मॅडम, पर्यवेक्षक काळे मॅडम जेष्ठ शिक्षिका श्रीरामे मॅडम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी हार्दिक अभिनंदन करून काैतुक केलेले आहे.