आटपाडीच्या तहसीलदारांच्या शासकीय वाहनावर वाळू तस्कराकडून हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी-मुढेवाडी रोडवर रात्रीच्या सुमारास वाळू तस्करानी हल्ला केल्याचा आरोप आहे. आटपाडी तालुक्याचे तहसीलदार बी एस माने यांच्या मोटारीवर डंपर घालून तहसीलदारांना (Tehsildar) जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. चालकाच्या प्रसंगावधानाने तहसीलदार आणि गाडीतील महसूल पथकाचे कर्मचारी सुखरुप आहेत. मात्र डंपरच्या धडकेनंतर मोटारीचे दरवाजे डंपरमध्येच सापडल्याने तहसीलदार काही काळ मोटारीतच अडकून पडल्या होत्या. तर डंपर चालक पोलिसांच्या ताब्यात आहे.
????नेमकं काय घडलं?
सांगली जिल्ह्यातील आटपाडीच्या तहसीलदारांच्या शासकीय वाहनावर वाळू तस्कराकडून हल्ला करण्यात आला. सोमवारी रात्री तहसीलदार बी एस माने या अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी पथकासह गेल्या होत्या. यावेळी आबानगर चौकात गस्त घालत असताना एक डंपर भरधाव वेगाने येत असल्याचे समजले. पथकाने त्याचानाही.ग केला. तर अचानक डंपरने चकवा दिला.
????महसूल पथकाचे कर्मचारी सुखरूप
त्याच ठिकाणी थोड्या वेळ गस्त घालत असताना मुंढेवाडीकडून भरधाव डंपर आला आणि तहसीलदार यांच्या गाडीवर डंपर घातला. चालकाच्या प्रसंगावधानाने तहसीलदार आणि गाडीतील महसूल पथकाचे कर्मचारी सुखरूप आहेत. कोणीही गंभीर जखमी झालेले नाही.
डंपरच्या धडकेनंतर मोटारीचे दरवाजे डंपरमध्येच सापडल्याने तहसीलदार काही काळ मोटारीतच अडकून पडल्या होत्या. तर डंपर चालक पोलिसांच्या ताब्यात आहे