ब्रह्मपुरी तालुक्यातील अनेक गावांना अतिवृष्टी व महापुराचा फटका बसलेला आहे. पुरामुळे अनेक गावातील धान पीक धोक्यात आले असून शेतकरी व पूरग्रस्त जनता भयभीत झालेली आहे .अशावेळी या पूरग्रस्त शेतकरी बांधवांना धीर देण्यासाठी ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर हे गावांना भेटी देऊन पूरग्रस्तांच्या समस्या ऐकून सोडवण्याचा प्रयत्न करीत आहेत.वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश देऊन शेतीचे पंचनामे तसेच पडलेल्या घरांचे पंचनामे तात्काळ करावे, असे निर्देश दिले आहेत.
अशातच मौजा बोरगांव येथील पूरग्रस्त शेतपिकांची पाहणी करण्याकरता आपल्या कार्यकर्त्यांसह दाखल झाले आणि शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या.बोरगाव येथील शेतकरी भेटी दरम्यान श्री रुपेश मैंद उपसरपंच बोरगांव, ईश्वर मैंद, शिवरामजी ठाकरे, पुंडलिकजी मातेरे, दिलीप तोंडरे, मन्सराम तोंडरे, प्रकाश तोंडरे,प्रभाकर भागडकर,संदीप तोंडरे,संजय मेश्राम यांचे सह अनेक गावकरी उपस्थित होते.
*यावेळी पंचायत समिती ब्रह्मपुरीचे माजी सभापती तथा भाजयुमो तालुकाध्यक्ष श्री रामलाल दोनाडकर तसेच ओबीसी आघाडीचे तालुकाध्यक्ष श्री प्रेमलालजी धोटे तसेच तळोधी खुर्द येथील सरपंच श्री अनिलजी तिजारे आणि युवा नेते श्री ज्ञानेश्वर जी दिवटे हे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते*