कारंजा (लाड) : कारंजा येथून जवळच असलेल्या ग्राम मनभा गावी परमहंस.श्री.नागाबाबा यांचे पुरातन संस्थान असून श्री. नागाबाबावर पंचक्रोशीतील भाविकांची मोठी श्रध्दा आहे. त्यामुळे दरवर्षी श्री.नागाबाबा यांचा पुण्यतिथी महोत्सव मोठ्या हर्षोल्हासात साजरा केल्या जात असतो. यावर्षी नुकताच पुण्यतिथी महोत्सव साजरा केला असता. कार्यक्रमाची मोठी रेलचेल दिसून आली.सकाळी श्रींचा महाभिषेक करण्यात आला.दुपारी ह.भ.प. सुश्री स्नेहगंगाश्रीजी शृंगारे माई ( आळंदीकर ) यांच्या अमृतमय वाणीमधून सुमधूर असे किर्तन झाले. त्यांनी आपल्या किर्तनामधून धर्मनिती बद्दल उत्तम असे ज्ञानामृत दिले. शिवाय विद्यार्थी वर्ग आणि लहान मुलांना "ओम् सरस्वतेयेन नमः॥" या मंत्राचा दररोज नित्यनेमाने जाप केल्यास विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढते व त्यांची अध्ययनात चांगली प्रगती होत असल्याचे सांगीतले.त्यांच्या धर्मनितीवर आधारलेल्या बहुमोल मार्गदर्शनाने श्रोतावर्ग मंत्रमुग्ध झाल्याचे दिसून आले. त्यानंतर सायंकाळी ०५:०० वाजता स्थानिक भजनी मंडळ व हरिपाठ मंडळाच्या संगीताचे गजरात भव्य पालखी सोहळा होऊन नगर परिक्रमा करण्यात आली. त्यानंतर दहीहंडीचा कार्यक्रम होऊन,श्रींचा महाप्रसाद (अन्नदान कार्यक्रम) झाला. संपूर्ण मनभावासियांसह पंचक्रोशीतील भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता, विश्वस्त मंडळाचे व्यंकटराव कावरे,नंदकिशोर कव्हळकर, अशोक देशमुख,किसनराव वडूरकर आदींनी अथक परिश्रम घेतले.असे वृत्त मिळाल्याचे ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी कळवीले.