ब्रम्हपुरी:-
अखिल कुणबी समाज मंडळ ब्रम्हपुरी यांच्या वतीने कुणबी समाज मंडळ सभागृहाच्या प्रस्तावित जागेवर २७ जानेवारी २०२४ शनिवार रोजी सकाळी १०.३० वाजता भव्य वधू-वर परिचय मेळावा, गुणवंत विद्यार्थी व मान्यवरांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. विदर्भातील चंद्रपूर,गडचिरोली भंडारा, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यातील असंख्य कुणबी बांधव मेळाव्यात सहभागी होणार असल्याने या भव्य दिव्य मेळाव्याच्या जय्यत तयारीला सुरुवात झाली आहे.
या कुणबी मेळाव्याला भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनील मेंढे उपस्थित राहणार आहेत. अध्यक्ष म्हणून राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे तर सत्कारमूर्ती म्हणून राज्याचे विरोधी पक्षनेते माजी मंत्री तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्यासह चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तिकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडिया यांची उपस्थिती असणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुधाकर अडबाले, आमदार प्रतिभाताई धानोरकर वरोरा विधानसभा क्षेत्र, माजी राज्यमंत्री परिणय फुके नागपूर, माजी आमदार आशिष देशमुख नागपूर, माजी आमदार सेवक वाघाये साकोली, प्रमुख मार्गदर्शक म्हणून अभिविलास नखाते शिवतीर्थ टुरिझम सावनेर, यांच्यासह रवींद्र शिंदे माजी अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, डॉ. अशोक जीवतोडे उपाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ , सुनील फुंडे अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भंडारा, देवराव भोंगळे माजी अध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपूर, अभय सिंगाडे अध्यक्ष खेडुले कुणबी संघटना जिल्हा वर्धा, प्रमोद काकडे जिल्हा प्रतिनिधी दैनिक सकाळ चंद्रपूर, विष्णू तिवाडे जिल्हा मार्केटिंग अधिकारी चंद्रपूर -गडचिरोली, दामोदर मिसार संचालक चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, प्रदीप वादाफळे उद्योजक व ओबीसी नेते यवतमाळ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे,
२७ जानेवारी रोजी होवू घातलेल्या अखिल कुणबी समाजाचा वधू-वर परिचय मेळाव्याला मोठ्या संख्येने अखिल कुणबी समाजातील बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अखिल कुणबी समाज मंडळ ब्रम्हपुरी अध्यक्ष रुषीजी राऊत, सचिव ऍड. गोविंद भेडारकर, उपाध्यक्ष प्रमोद चिमुरकर, सहसचिव राजेश पिलारे, कोषाध्यक्ष फाल्गुन राऊत, सदस्य महादेव दर्वे, ओमप्रकाश बगमारे, रामकृष्ण चौधरी, नेकराज वझाडे, राजेश दोनाडकर, अल्काताई खोकले, भाऊराव राऊत, योगेश मिसार, जगदिश (मोंटू) पिलारे, प्रा. तेजस गायधने, सल्लागार मंडळ प्राचार्य डॉ. देवीदास जगनाडे, हरीशचंद्र चोले, डॉ. सतिश दोनाडकर, क्रिष्णाजी सहारे, प्रेमलाल धोटे, उमेश धोटे तसेच सर्व समाज बांधवांनी केले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....