कारंजा : स्थानिक विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे संस्थापक अध्यक्ष संजय कडोळे हे कारंजा नगरीतील ज्येष्ठ व सर्वात अनुभवी सेवाव्रती पत्रकार म्हणून ओळखले जातात.गेल्या चाळीस वर्षापासून अथकपणे त्यांची पत्रकारीता व साहित्यलेखन सुरू असून ते गोंधळी लोककलावंत म्हणून सर्वांना परिचित आहेत.त्यांच्या कार्याची दखल घेऊन मदतने त्यांना 'संत गाडगेबाबा स्वच्छतादूत' ह्या राष्ट्रिय पुरस्काराने तर महाराष्ट्र शासनाने सन २०१९ मध्ये 'राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा ह्या राज्य शासनाच्या पुरस्काराने गौरवांकित केले होते.त्यांच्या अथक व अविरत अशा लोकोपयोगी सेवाव्रती कार्यामुळेच त्यांची समाजाला ओळख असून,रात्री बेरात्री ते अडीअडचणीत असणाऱ्यांच्या मदतीला धावून जात असतात. त्यामुळे माणसांना माणसांशी जोडण्याचे पवित्र कार्य त्यांनी केले आहे.कारंजा येथे त्यांचा सर्वधर्मिय,सर्वपक्षिय खूप मोठा चाहता वर्ग व मित्रमंडळ आहे. त्यांच्या चाहत्यांकडून दरवर्षी दि २७ जुलै रोजी त्यांचा वाढदिवस थाटामाटात केल्या जात असतो. व विविध संस्थांतर्फे त्यांच्या सत्काराचेही आयोजन केले जात असते.यंदाही मित्रमंडळीनी त्यांच्या वाढदिवशी "निःस्वार्थ समाजसेवकांच्या गौरव सोहळ्याचे" आयोजन ठरवीले होते. परंतु त्यांचे कनिष्ठ बंधू स्व. उमेश कडोळे यांचे नुकतेच निधन झाल्यामुळे दुःखात बुडालेल्या,संजय कडोळे यांनी आपल्या वाढदिवशीचे पूर्वनियोजीत कार्यक्रम रद्द केल्यामुळे वाढदिवस होणार नसल्याचे जाहीर केले होते. वाढदिवसानिमित्त,दि.२७ जुलै २०२५ रोजी,संजय कडोळे यांनी एकूण पाच निराधार वयोवृद्ध कुटूंबियांचे दर्शन घेऊन त्यांचे शुभाशिर्वाद घेतले.यावेळी त्यांनी खारीचा वाटा म्हणून,पाच कुटूंबियांना एक आठवडाभर पुरेल एवढ्या जिवनावश्यक किराणा मालाची किट देवून अल्पशी 'फुल नाही तर फुलाची पाकळी' एवढी मदत केली आहे.