अकोला : मुळचे कारंजा (लाड ) येथील पण सध्या कानाशिवनी (अकोला) जवळच्या सुकळी (नंदापूर) येथे स्थायिक झालेले गोंधळी समाजाचे ज्येष्ठ व्याक्तिमत्व स्व आनंदराव पुंजाजी कडोळे यांचे वृद्धापकाळाने, मंगळवारी दि ११ ऑक्टोंबर रोजी निधन झाले असून सुकळी (नंदापूर) गावात व पंचक्रोशित ते मनमिळाऊ व सुस्वभावाचे असल्यामुळे त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच शोककळा पसरून पंचक्रोशीतील व्यक्ती हळहळत होते. टाळ मृदंगाच्या गजरात व हरिभजनात बहुसंख्य नागरिकांचे उपस्थितीत त्यांची अंत्ययात्रा बुधवारी दि १२ ऑक्टोंबरला निघाली होती . त्यांच्या मागे त्यांची पत्नी, चार मुले मोहन, माधव, गणेश व संतोष कडोळे असून सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांची दशक्रिया सुकळी ( नंदापूर ) येथे दि २० ऑक्टोंबर रोजी होणार असून दि २३ ऑक्टोंबर रोजी होणार असल्याचे त्यांचे कारंजा येथील नातू संजय कडोळे यांनी कळवीले आहे.