नागपूर येथे आष्टेडू मर्दानी आखाडा असोशियशन,महाराष्ट्र राज्य अंतर्गत 13 आणि 14 ऑक्टोबर 2023 रोजी, राष्ट्रीय मास्टर रेफ्रि सेमिनार आमदार भवन, नागपूर येथे घेण्यात आहे होता. यामध्ये सर्व राज्यातील प्रशिक्षकांनी भाग घेतलेला होता. यामध्ये आष्टेडू मर्दानी आखाडा या खेळातील हस्तकला, शिवकला, मर्दानीकला, फरीगदका, बहिरजी काठी, सहयाद्री लाठी, इत्यादी खेळाबद्दल दोन दिवस प्रशिक्षण देण्यात आले. आणि होणाऱ्या समोर होणाऱ्या शालेय राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरीय, स्पर्धेमध्ये वेळेनुसार बदल होणाऱ्या नियमाबद्दल संपूर्ण माहिती देण्यात आली. हा खेळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील असून, प्राचीन कला यामध्ये समाविष्ट केलेली आहे. ह्या दोन दिवसीय रेफ्री सेमिनार मध्ये आंतरराष्ट्रीय कराटे प्रशिक्षक श्री.गणेश लांजेवार यांनी उत्कृष्ट कामगिरी करत पंच परीक्षा पास केली आहे. ही परीक्षा आष्टेडू मर्दानी आखाडा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष महागुरु श्री.राजेश तलमले सर यांच्या मार्गदर्शनामध्ये घेण्यात आली होती. तसेच चंद्रपूर जिल्हा आष्टेडू मर्दानी आखाडा असोशियनचे प्रशांत पिपरे, मनोज डे, स्वप्निल डंबारे, कुशवाह मॅम, लोकेश जीवतोडे यांनी सुद्धा पंच परीक्षा उत्तीर्ण करून राष्ट्रीय पंच होण्याचा मान मिळवला.. या सर्व प्रशिक्षकांना गुरु ऋषी सुपारी सर, गुरु लवाटे सर आणि आष्टेडू मर्दांनी आखाडा जिल्हा चंद्रपूरचे अध्यक्ष- गणेश तर्वेकर सर, कोषाध्यक्ष -उदयकुमार पगाडे सर, यांनी पुढच्या वाटचाली साठी गणेश लांजेवार सर यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या....