मुंबई : वाशिम जिल्ह्यातील साहित्य,संस्कृती, कला, लोककला व सामाजिक कार्यातील अग्रणी असलेल्या, "विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा" कडून संस्थापक अध्यक्ष संजय कडोळे (महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त समाजसेवक) ; उमेश अनासाने, प्रदिप वानखडे, रामबकस डेंडूळे, शिवमंगल राऊत, प्रकाश गवळीकर यांचेकडून,गेल्या दहा वर्षापासून भरीव अशी कामगीरी केल्या जात आहे. कलाकारांच्या रास्त मागण्यांकरीता त्यांनी यापूर्वी दोन वेळा हिवाळी अधिवेशनामध्ये विधानसभेवर मोर्चे सुद्धा काढले आहेत.त्याशिवाय अनेकवेळा वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर त्यांनी धरणे आंदोलन,साखळी उपोषण केलेली आहेत. सातत्याने संघटनेतर्फे कलावंताच्या न्याय हक्क मागण्या व अधिकारा करीता त्यांच्या आमदार, मंत्र्याशी भेटी गाठी व पत्रव्यवहार सुद्धा सुरु असतो.गेल्या वर्षभरापासून विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा ही संस्था, "वाढत्या महागाईला अनुसरून कलावंताच्या मानधनात महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाने किमान पाच हजार रुपये पर्यंत वाढ करावी. "पालक मंत्र्याद्वारे "जिल्हा वृद्ध साहित्यीक कलाकार समितीचे" गठन व्हावे. "गेल्या पाच वर्षापासून प्रलंबीत असलेले कलाकाराचे मानधनाचे अर्ज निकाली निघून पात्र लाभार्थी कलाकारांना मानधन मंजूर व्हावे." "सप्तखंजेरी प्रबोधनकार सत्यपाल महाराजांना शासनाने महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करावे." प्रलंबित असलेला सामाजिक न्याय विभागाचा "डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार सोहळा व राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार सोहळा" घेण्यात यावा ह्यासाठी आग्रही असून पत्रव्यवहारा द्वारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री यांचेकडे सतत पाठपुरावा करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रस्तावावर आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा होण्याची शक्यता असल्याची माहिती आमच्या मंत्रालय प्रतिनिधी कडून मिळाली आहे. तसेच आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत प्रामुख्याने कलाकार मानधन वाढीच्या विषयावर सुद्धा निर्णय होण्याची शक्यता असल्याचे वृत्त विदर्भ लोककलावंत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीले आहे.