तालुक्यातील दक्षिण परीसरात येणाऱ्या बरडकिन्ही गाव परीसरात बी,एस,एन,एल जीओ आयडिया vi कंपनीचे टाॅवर उभारले. आहेत.मागील २०२० मध्ये आलेल्या महापुरापासुन मात्र jio,vi, आयडिया, BSNL, इतर सेवांचे नेटवर्क राहत नसल्यामुळे गावात असलेल्या मिनी बँक, आपले सेवा सरकार केंद्र व ईतर सेवा नागरीकांना देणाऱ्यांना कमालीचं त्रास सहन करावे लागतं आहे. दोन वर्षापासून अध्यापही कंपनिला मुहूर्त सापडत नसल्याने हे टाॅवर शोभेची वस्तु बनली आहे. या परीसरात बी,एस,एन,एल ,jio आयडिया,vi, इतर नेटर्वक उपलब्ध आहे मात्र ,कुणाशी संपर्क केल्यास वांरवार रिडायल करुन सुध्दा फोन लागत नाही. वारंवार सेवेचा लपंडाव पन चालु असतो अशी अवस्था झालेली आहे. तसेच इंटरनेट सुविधेचा पूर्णतः अभाव आहे.त्यामुळे इंटरनेट सुविधेसाठी ग्राहक कंपनी कडे कडे मोठ्या आशेने पाहत आहेत.परंतु २ वर्ष लोटुनही अजुन पर्यंत या सेवांचा network आलेला नाही. बरडकिन्ही परीसरात इंटनेटचा अभाव आहे.त्यामुळे परिसरातील ग्राहक ऑंनलाईन गोस्टीबद्दल सुध्दा अनभिज्ञ आहेत.याचा परीणाम परीसरातील नागरीकांना सहन करावा लागत आहे.आजकाल सर्व कार्यालयीन खाजगी व शासकीय कामे ऑंनलाईन पध्दतीने झाले आहेत. परंतु परीसरात इंटरनेट सुविधा नसल्यामुळे लोंकाना सरळ मोठ्या इमारतीवर चढून बोलावे लागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सूरू असून ईमारतीवर जावून बोलू शकत नाहि किवा ईतर सेवा देवू शकत नाहि.त्यामुळे नागरीकांना मनस्ताप सहन करावे लागत आहे.संबधित विभागाने लक्ष घालुन सेवा सुरळीत करण्याची मागणी परीसरातील नागरीकाकडुन होत आहे.