कारंजा [लाड] : शासकिय नोकऱ्या मिळत नाहीत. त्यामुळे तळागाळातील,अल्पसंख्याक, होतकरू व स्वावलंबी विचारसरणीची तरुण बेरोजगार मंडळी मिळेल ते काम करून कुटूंबाचा गाडा हाकलीत असतात.असाच कारंजा येथील अल्पसंख्याक जैन समाजातील तरुण इलेक्ट्रिशियन [ वायरमन ] बंद झालेली लाईन चालू करण्याकरीता शांतीनगर येथील डी पी उघडून पहाण्याचा गेला असता भडका होऊन आगीचा लोळ त्याचे दिशेने झेपावला. व त्यामध्ये मंगेश संतोष गवारे याचा संपूर्ण चेहरा व छाती पूर्णपणे भाजल्या जाऊन गंभीररित्या तो जखमी झाला आहे. स्थानिक महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना उशीरा हे वृत्त मिळाले असून, सध्या मनोज संतोष गवारे यांची मृत्युशी झुंज सुरू असून, ते रुग्नालयात भरती आहे. त्याचे कुटूंब आर्थिक परिस्थितीने हतबल आहे.भर उन्हाळ्याचे दिवसात तो जगण्याकरीता धडपडत आहे.त्याच्या उपचाराकरीता त्याला पैशाची निकड आहे. तरी ह्या वृत्ताद्वारे आपल्या समाजातील दानशूर व्यक्तिंनी त्याचे दुःख समजून अशा वाईट संकटात त्याचे मनोज गवारे,फोन पे / गुगल पे नं.९५२७३९६७१४ या क्रमांकावर, आपआपल्यापरीने जास्तित जास्त आर्थिक मदत पाठवून हातभार लावावा.असे आवाहन करण्यात येत आहे.