कारंजा (लाड) : कारंजा शहर पोलीस स्टेशनच्या गुप्तचर विभागातील पो.कॉ. उमेश चचाणे ह्यांची कन्या कु.अक्षरा उमेश चचाने हिने मार्च 2025 मध्ये नुकत्याच झालेल्या शालांत परिक्षेत 90.20 % गुण मिळवीत इयत्ता दहावीमध्ये सुयश मिळवील्याबद्दल,वाशिम जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक अनुज तारे यांनी ह्यांनी स्वतः तिचा गुणगौरव करून कौतुक केले आहे.कु.अक्षरा उमेश चचाणे ही कारंजा शहरातील नामांकित असलेल्या सौ. शोभनाताई नरेंद्रकुमार चवरे विद्या मंदिर कारंजाची विद्यार्थीनी असून तिने आपल्या यशाचे श्रेय आई सौ.कविता ,वडील उमेश आणि गुरुजनांना दिले आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष संजय कडोळे यांनी तिला पुढील यशस्वी शैक्षणिक वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.