वाशिम : शेतकरी मित्रांच्या शेती विषयक अडीअडचणी सोडविण्याकरीता आणि योग्य मार्गदर्शन देण्याच्या निष्काम उद्देशाने मालेगाव तालुक्यातील नागरतास येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन, चार वर्षापूर्वी "भाग्यलक्ष्मी शेतकरी मंच" या नावाने व्हॉटस्एप ग्रुप सुरु केला होता. नुकतेच भाग्यलक्ष्मी शेतकरी मंचाकडून, शनिवार दि 18 ऑगस्ट 2024 रोजी, सकाळी 10:00 वाजता, श्री जगदंबा देवी संस्थान नागरतास येथील सभागृहात शेतकरी चर्चा सत्र व शेतकऱ्यांच्या प्रकट मुलाखती घेऊन त्यांना शेतीविषयक बहुमोलाचे मार्गदर्शन करण्यात आले. ह्या कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून हळद उत्पादक शेतकरी डॉ गजानन ढवळे हे होते तर प्रमुख उपस्थिती मध्ये दूध उत्पादक शेतकरी संजय घायाळ, प्रगतीशिल शेतकरी दत्ताराव मामा चव्हाण,टरबूज व सिताफळ उत्पादक शेतकरी ॲड कैलासराव जाधव, कृषीभूषण महाराष्ट्र राज्यस्तरिय पुरस्कारार्थी शेतकरी राधेश्याम मंत्री,कृषी विज्ञान मंडळ ताकतोडाचे मुख्यसमन्वयक राहूल कव्हर,संत्रा उत्पादक शेतकरी भगवानराव शिंदे, हवामान अभ्यासक गोपाल गावंडे,हळद उत्पादक शेतकरी उमेश सावके आदींची उपस्थिती होती. चर्चासत्रात जिल्ह्यातील तज्ञ मार्गदर्शकाकडून शेतकऱ्याना योग्य सल्ला देण्यात आला. यावेळी मानोरा तालुक्यातील ग्राम रुई (गोस्ता) येथील सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक गोपाल विश्वनाथ गावंडे यांनी चालू हंगामात पावसाबाबत दिलेले सर्वच अंदाज 100% अचूक ठरल्या बद्दल भाग्यलक्ष्मी शेतकरी मंचाकडून त्यांचा शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून विशेष सत्कार करण्यात आला. तसेच सर्व उपस्थित शेतकऱ्यानी टाळ्याच्या कडकडाटात त्यांचे अभिनंदन केले.कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन महादेव नवघरे,नितीन काळे, दिनकर जाधव,राम जाधव, तय्यब पठाण,गोपाल घुगे,विष्णू तागड,नारायण चव्हाण राणे, मोहन देवळे,विठ्ठल धनगर व भाग्यलक्ष्मी शेतकरी मंच ग्रुपच्या सहकाऱ्यांनी केले होते. असे वृत्त शेतकरी मित्र असलेले महाराष्ट्र शासन पुरस्कारार्थी दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी कळवीले.