कारंजा (लाड) : श्रीक्षेत्र शेगावनिवासी "ब्रम्हांडनायक" श्री संत गजानन महाराज यांचा प्रगटदिन त्यांची भक्त मंडळी केवळ शेगावात, महाराष्ट्रात, भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात महत्वाचा सण म्हणून आनंदोत्साहात साजरा करीत असतात. संत गजानन महाराज आज समाधीस्थ झालेले असले तरीही त्यांच्या अनुभूतीचा प्रत्यय हा भाविक भक्तांना सातत्याने येतच असतो व त्यामुळे संत गजानन महाराजांच्या भाविक भक्तांची संस्था क्षणोक्षणी वाढतच असतांना दिसून येत आहे. येत्या दि. १३ फेब्रुवारी रोजी श्रींचा प्रगटदिनोत्सव साजरा होणार असल्याने, कारंजा येथील मानोरा रोड ( पसरणी मार्ग ) लगत असलेल्या, कोहिनूर कॉलेनी येथील श्री संत गजानन महाराज संस्थान येथे संस्थानचे विश्वस्त मंडळ आणि स्थानिक रहिवाशी भाविकांनी, दि ६ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी पर्यंत व्यसनमुक्ती सम्राट भागवताचार्य हभप रामेश्वर महाराज खोडे रा. इसापूर यांच्या अमृतमय वाणीतून, संगीतमय श्रीमद भागवत कथेचे आयोजन केले आहे.

या निमित्ताने दि ६:०० फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते १०:०० वाजेपर्यंत कोहिनूर कॉलनीत ग्रंथदिडी काढण्यात येईल . त्यानंतर दररोज दुपारी ०१:०० ते ०४:०० वाजेपर्यंत श्रीमद् भागवत कथा तर दररोज सायंकाळी ०६:०० ते ०७ : ०० वाजेपर्यंत हरिपाठ व रात्री ७ : ३० ते १० : ०० पर्यंत अनुक्रमे, दि ६ फेब्रुवारीला- प पू श्री श्री ईश्वरानंदजी श्री श्री उत्तम स्वामीजी महाराज यांचे प्रवचन व दर्शन सोहळा, दि ७ फेब्रुवारीला- केकतउमरा येथील चेतन सेवांकुर आर्केस्टा यांचा अंध मुलांचा, प्रेरणादायी संगीत कार्यक्रम, दि ८ फेब्रुवारी रोजी बालकिर्तनकार हभप वैभव महाराज ठिलोरकर यांचे सप्तखंजेरी प्रबोधन, दि ९ फेबुवारी रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिध्द युवा किर्तनकार ( झी टॉकीज फेम गजर किर्तनाचा सोहळा आनंदाचा मधील ) हभप शिवलिलाताई पाटील यांचा विनोदी आणि शिवचरित्रावरील किर्तनाचा कार्यक्रम, दि १० फेब्रुवारी रोजी श्री गुरुदेव सेवा मंडळ संजय ताथोड कला संच यांचा भजनसोहळा, दि ११ फेब्रुवारी रोजी डॉ सुशिल देशपांडे यांचे कडून आध्यात्मिक सत्संग आर्ट ऑफ लिव्हींग, दि १२ फेब्रुवारी रोजी प्रविण पाटील लुंगे यांचा सुरसंगम मुझिकल आर्केस्टा पारवा, तसेच दि १३ फेब्रुवारी रोजी श्रींचा महाभिषेक, होमपूजा, पालखी सोहळा आणि दुपारी १२:०० वाजता व्यसनमुक्ती सम्राट हभप मधुकर महाराज खोडे यांचे दहीकाल्याचे किर्तन दुपारी ०१:०० वाजता संत महंत, किर्तनकार, प्रवचनकार, वारकरी, देणगीदाते, मान्यवरांच सत्कार सोहळा करण्यात येईल. दुपारी ०१ : ३० ते रात्री १० : ०० पर्यंत श्रींच्या महाप्रसाद ( अन्नदानाचा ) कार्यक्रम व दुपारी ०१:०० ते रात्री संत ज्ञानेश्वर महाराज भजनी मंडळ चांभई - मंगरूळनाथ यांचे भजनाचा कार्यक्रम होईल असे वृत्त संस्थानच्या वतीने प्रसिद्धी प्रमुख राजीव भेंडे यांनी महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवीले आहे. सदर्हू कार्यक्रमाला आ . राजेंद्र पाटणी, जि प अध्यक्ष चंद्रकांतदादा ठाकरे, दत्तराज डहाके, सुनिल पाटील धाबेकर, युसूफ पुंजानी, हेमेंद्र ठाकरे, शेखर बंग, जयेश लोढाया, ललित चांडक, डॉ राजीव काळे, यशवंत देशमुख आदी मान्यवरांची उपस्थिती असणार असल्याचे सुध्दा कळविण्यात आले आहे. तरी भाविक मंडळीनी कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थान तर्फे करण्यात आले आहे .
आपल्या प्रतिक्रिया द्या....