सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले व संपूर्ण महाराष्ट्रात निष्काम कर्मयोगी संत गाडगे बाबा यांच्या वेशभूषेत समाज प्रबोधन करत सामाजिक सलोखा व समता अबाधित राखण्यासाठी विविधांगी कार्य करणारे पी.एस. खंदारे यांच्या कार्याची दखल ग्लोबल ह्युमन राइट्स प्रोटेक्शन फोरम या मानवाधिकार संस्थेने घेतली आहे. जागतिक मानवाधिकार दिनी दहा डिसेंबर रोजी दिल्ली येथे भारत सरकारच्या विविध विभाचे केंद्रीय सचिव तथा मंत्री महोदयांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
पी. एस. खंदारे यांनी आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात सन 1990पासुन केली आहे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ते सक्रिय कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत तसेच दलित,आदिवासी,भटके विमुक्त समाजातील लोकांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विषयावर शासनदरबारी पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत, महिला व बालकांवरील अन्याय अत्याचार संदर्भात केंद्र व राज्य शासनाच्या विविध आयोगा सोबत जनसुनावणी चे कार्यक्रम आयोजित केले आहेत, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या माध्यमातून लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी सप्रयोग व्याख्याने दिली आहेत, जवळपास चार हजार गावे पैदल दौरा करून जनजागृती केली आहे तसेच शेकडो शाळा महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे, उज्ज्वल उद्यासाठी वारसा समाज सुधारकांचा,विवेकाचा, अंधश्रद्धा निर्मूलनाचा हे महा अभीयान राबविले आहे, व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी व्यसन विरोधी अभियान, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विविधांगी कार्य, ग्राम स्वच्छता अभियान, सामाजिक सलोखा व जातीय हिंसाचार रोखण्यासाठी संविधानीक मार्गाने शासनाच्या सहभागातून विविध लोकोपयोगी उपक्रम राबविले आहेत, संविधानाचा जागर व प्रसार प्रसार सुरू आहे, निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या विचाराने प्रभावित होऊन गाडगेबाबा यांच्या वेशभूषेत गेले विस वर्ष ते सातत्याने लोक प्रबोधन करत आहेत महाराष्ट्रात आधुनिक गाडगेबाबा म्हणून ते सुपरिचित आहेत, त्यांना अखंड हरिनाम सप्ताहात,किर्तनात मोठ्या प्रमाणात निमंत्रित केले जाते मानवाधिकारासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या समाज सेवकास राष्ट्रीय समाज सेवा पुरस्कार देऊन वाशीम जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असल्याचे जनसामान्यांच्या भावनामधून व्यक्त होत आहे व पी.एस.खंदारे यांचे अभिनंदन केले जात आहे.