*जागतिक महिला दिना निमित्त सर्वधर्मिय कतृत्ववान महिला गृहीणीचा गुणगौरव !* कारंजा : जागतिक महिलादिनाचे निमित्ताने दरवर्षी प्रमाणे यंदाही आदर्श जय भारत सेवाभावी संस्था कारंजा तथा विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाच्या वतीने,सर्वधर्मिय कतृत्ववान गृहीणींचा सत्कार समारंभ संस्थेच्या कार्यालयात,बुधवारी दि.८ मार्च रोजी घेण्यात आला.
यावेळी झालेल्या समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ महिला श्रीमती शांताबाई गरड ह्या होत्या.तर प्रमुख उपस्थितीमध्ये आदर्श जय भारत सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर गरड आणि विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे हे होते.जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.
यावेळी डॉ. ज्ञानदेवी गरड,तस्लीमाबी अनिस शेख,सौ कविता अटक,सौ मालतीताई पाईकराव,सौ चैताली येवतकर,कु.संजीवनी गरड, कु.कविता अटक,कु.गौरी गरड,वेदिका येवतकर,प्राजक्ता राठोड इत्यादींचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलतांना,डॉ.ज्ञानेश्वर गरड यांनी स्त्रीशक्ती हा पुरुषाचा आधार असल्याचे सांगत प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा सिहाचा वाटा असल्याचे सांगीतले तर "आजची माहिला ही चूल आणि मूल एवढ्यापुरती मर्यादित न रहाता,आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहे.आपल्या स्वतंत्र भारतात आजची महिला देशाची प्रथम नागरीक राष्ट्रपती म्हणून ओळखल्या जात आहे. प्रत्येक क्षेत्रात तिने पुरुषाच्या बरोबरीने प्रगती करीत समान अधिकार प्राप्त केला असल्याचे सांगून त्यामुळे ह्या मातृशक्तिला नमन करून त्यांचा गुणगौरव करणे" आपले आद्यकर्तव्य असल्याचे संजय कडोळे यांनी सांगीतले. कार्यक्रमाचे संचालन कु. संजीवनी गरड हिने तर आभार प्रदर्शन कु.गौरी गरड हिने केले.