वाशिम : आज स्वतंत्र झालेल्या आधुनिक भारतात लोकशाही नांदत असतांना देखील महाभारताचे पर्व सुरू झाले असल्याचे दिसून येत असून,सत्त्ता प्राप्तीसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणूकांमध्ये मोठमोठ्या नेत्यांनीच नात्यागोत्यांना आणि वर्षानुवर्षाच्या मैत्रीला काळीमा फासल्याचे स्पष्ट झाले आहे. राजकारणात युपी बिहार मध्ये वडिलांच्या विरोधात मुलांनी जावून,बापाला सत्तेतून खेचून मुख्यमंत्री पदाची खुर्ची हिसकावून घेतल्याची उदाहरणे घडली.तर सकाळी वडिलांसमोर बसून चहापान करणारे सायंकाळी शत्रूसोबत मंत्रीपदाची शपथ घेतांनाही आपण पाहिले. जीवलग मित्रांच्या छातीत खंजीर खुपसून दुश्मना सोबत हातमिळवणी करणारे आजचे राजकारणी बघीतले म्हणजे येथे कलियुगाचा प्रचंड प्रभाव वाढल्याचे स्पष्ट होते.त्यामुळे आता सत्य,अहिंसा, न्याय,स्नेह आणि श्रद्धा शिल्लक राहीली नसल्याचे दिसून येत आहे.देशातील राजकारणाचा प्रत्येक नागरिकांवर प्रभाव पडत आहे.निवडणूक निकाल जाहिर होताच राजकीय उमेद्वार सत्तारुढ होऊन सत्ताधिश होतील. सत्ताधिश आणि विरोधी पक्ष नेते परत एकमेकाशी असलेला वैरभाव, एकमेकावरील टिकाटीप्पणी ,मानापमान विसरून एकमेकाशी हातमिळवणी करतील.तर दुसरीकडे त्यांचेशी एकनिष्ठ असणारे उतावीळ कार्यकर्ते तोंडघशी पडतील.मात्र असे होता कामा नये. कार्यकर्त्यानी निवडणूक संपल्या नंतर त्यांचा नेता निवडून येवो.प्रचंड बहुमताने निवडून येवो किंवा पराभूत होवो. आता तुमचा नेता मनावर घेणार नाही.नक्कीच निवडणूकीतील उमेद्वार जनमताचा मिळालेला कौल आणि निवडणूक आयोगाचा निर्णय शिरसावंद्य मानतील.त्यामुळे तळागाळातील सर्वसामान्य गोरगरीब मतदारांनी देखील "रात गयी बात गयी" याप्रमाणे यापुढे राजकारणाचा विषय आपल्या डोक्यातून, आपल्या मनातून बाहेर काढला पाहिजे व नुसत्या उचापती करण्यापेक्षा कार्यकर्ता विरोधी पक्षाचा असो. तो आपला भाऊबंद आहे .