कारंजा (लाड) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत बाप्पांचा गणेशोत्सव हा राष्ट्रिय व सामाजिक एकोप्याकरीता साजरा करण्याचा पायंडा लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी पाडून दिला आहे. त्यामुळे ही परंपरा सुरु रहावी. त्या दृष्टीने प्रत्येक गणेशभक्त प्रयत्न करीत असतो.त्याच प्रमाणे विसर्जन मिरवणूकीच्या निमित्ताने,आपले कर्तव्य चोखपणे बजावण्यात कारंजाच्या किन्नर श्रावणी हिंगांसपूरे देखील मागे नाहीत. सण,उत्सव,पालख्या, मिरवणूक,भजन,पूजन आदी उत्सवात कारंजाच्या लोकप्रिय किन्नर श्रावणी हिंगासपूरे यांचा नेहमीच पुढाकार राहीलेला आहे.विशेष म्हणजे 'सातारा लुटून पुण्याला दान करावे.' या पद्धतीने श्रावणी हिंगासपूरे ह्या लोकवर्गणी करतात.व मिळालेल्या लोकवर्गणीमधून अगदी इमाने इतबारे श्रीगणेशोत्सव आणि श्रीदुर्गोत्सव मिरवणूकीमध्ये सहभागी होणाऱ्या मंडळाचा व सामाजिक कार्यकर्त्याचा सत्कार आणि मिरवणूकीमधील सहभागी मंडळ कार्यकर्ते,भाविक भक्त तथा प्रेक्षकांकरीता,विसर्जनाचे दिवशी सकाळी ११:०० ते रात्रौ १०:०० वाजेपर्यंत सतत बारा तेरा तास , महाप्रसाद भंडाऱ्याचे (अन्नदानाचे) वितरण करीत असतात.एखाद्या बड्या धनाढ्य दानशूरालाही लाजवेल अशा प्रकारे त्यांची ही महाप्रसाद अन्नदानाची मानवसेवा सुरु असते.त्यामुळे 'एक किन्नर जान से भी प्यारा है' असेच म्हणावेसे वाटते.अशा प्रकारे त्यांनी कारंजेकरांचा विश्वास संपादन केलेला आहे.त्यांची ही मानवसेवा खरोखरीच प्रशंसनिय आहे.करीता जास्तित जास्त दानशूर मंडळी आणि कारंजेकरांनी आपल्या ह्या सामाजिक उपक्रमाला हातभार लावून त्यांना अन्नदानाकरीता भरीव आर्थिक मदत करावी. व विसर्जन मिरवणूकीत उपाशी तापाशी सहभागी होऊन, दमलेल्या कार्यकर्ते,खेळाडू, गणेशभक्त,देवी भक्त यांच्या पोटाला महाप्रसादाचा आधार देण्यासाठी स्वेच्छेने देणगी द्यावी. असा मानस कारंजाच्या लोकप्रिय किन्नर श्रावणी हिंगासपूरे यांनी व्यक्त केला आहे.त्याकरीता त्यांनी फोन पे नंबर : 7263868903 दिला असून सोबत फोन पे स्कॅनर दिले आहे. त्यामुळे श्री गणेश विसर्जन मिरवणूकी निमित्ताने होणाऱ्या भव्य अशा महाप्रसाद किंवा भंडारा अन्नदानाकरीता संकोच न बाळगता कारंजेकरांनी,आजी माजी नगरसेवक,पदाधिकारी, राजकिय कार्यकर्ते, व्यापारी, व्यावसायीक गणेश भक्तांनी जास्तीत जास्त रक्कम देण्याचे आवाहन केले आहे. तसेच गोरगरीब व्यक्तीही फोन पे वर स्वेच्छेने कमित कमी रक्कम देवून खारीचा वाटा उचलू शकतात.किन्नरांना सत्कार्याकरीता दान केल्याने आपल्या मागील दारिद्रय व दुर्दशा संपुष्टात येऊन माता लक्ष्मीची निरंतर कृपा होते.असेही किन्नर श्रावणी हिंगासपूरे यांनी स्पष्ट केले आहे.