दरवर्षीप्रमाणे यंदाही दिनांक 9 सप्टेंबर रोजी वरोरा तालुक्यात गणपतीचे विसर्जन करण्यात येणार आहे या विसर्जनासाठी पोलीस विभाग वरोरा यांचेकडून नागरिकांना गणेश विसर्जनाचे विसर्जन शांततेत पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले आहे या विसर्जनासाठी पोलीस विभागात तर्फे कोणत्याही प्रकारचीअनुचित घटना घडू नये याची खबरदारी म्हणून तगडा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
गणपती विसर्जन शांततेत पार पडावे यासाठी गुंड प्रवृत्तीच्या, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कलम 144 सीआरपीसी नुसार कारवाही करून दि 8सप्टेंबर ते 11सप्टेंबरपर्यंत जिल्हा बाहेर जाण्याचे आदेश40 लोकांवर जिल्ह्यात राहण्यास प्रतिबंध घातला आहे सदरचा प्रतिबंधित आदेश विभागीय पोलिस अधिकारी, सहाय्यक पोलीस अधीक्षक, विशेष कार्यकारी दंडाधिकारी आयुष नोपाणी यांनी काढलेला असून या 40 लोकांवर आदेश बजावण्यात आलेला आहे तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकावर कलम 107,116(3), अन्यवे प्रतीवृत्त पाठविण्यात आलेले आहे या विसर्जनादरम्यान कुठलाही दखलपात्र अदाखलपात्र गुन्हा कुणी करू नये म्हणून कलम 149 सीआरपीसी प्रमाणे 13 लोकांवर शांतता राखण्यासंबंधी नोटीस बजावण्यात आलेली आहे