ब्रम्हपुरी:-
मासिक-पाळी मध्ये किशोरवयीन मुलींना होणारा त्रास, त्यावेळेस कोणती काळजी घेतली पाहिजे, महिलांचे अधिकार, चांगले व्यसन, वाईट व्यसन, इत्यादी विषयक पुरेपूर माहिती मिळावी, ह्यासाठी "ईसाफ बँक फाउंडेशन, नागपूर आणि न्यू लाईफ बहूउद्देशिय संस्था, ब्रम्हपुरी" यांच्या सहकार्याने काल दिनांक.25/07/2023 रोजी मंगळवारला, जनता कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, नागभीड येथे दुपारी 3 वाजता विशेष मार्गदर्शन & जनजागृती उपक्रम घेण्यात आला..
सदर कार्यक्रमात डॉ.पूजा साबळे व सौ.सुनीता वानखेडे मानले शाळेतील सर्व मुलींना मासिक पाळी विषयी माहिती देत, होणारा त्रास व कोणती काळजी घेतात, हे समजावून सांगितले.
सौ.आरती गेडाम (पोलीस विभाग, नागभीड) यांनी महिलांचे अधिकार व पोलीस विभागातील पोलीस दीदी उपक्रमाविषयी सांगितले.
युवा समाजसेविका कुमारी.पूनम कुथे यांनी चांगले व्यसन, वाईट व्यसन, गुड टच आणि बॅड टच विषयी प्रात्यक्षिक करून दाखवीत मार्गदर्शन केले, आत्मरक्षणाचे धडे दिले.
ह्या कार्यक्रमात शाळेचे पर्यवेक्षक श्री.चुटे सर, सौ.आरती गेडाम (पोलीस कॉन्स्टेबल, नागभीड), डॉ.पूजा साबळे मॅम (PHC नवेगावं पांडव,नागभीड)
सौ.सिमा मेश्राम (समुपदेशक- आर.एच.नागभीड),
सौ.सुनीता मॅम (समाजसेविका नागपूर),
कुमारी.पूनम कुथे मॅम (समाजसेविका ब्रम्हपुरी), श्री.अमित दास सर,
श्री.राजेंद्र नारनवरे सर,
श्री.उदय पगाडे सर (समाजसेवक ब्रम्हपुरी),
श्री.सुमित यादव सर,
श्री.संदिप जोशी सर,
सौ.पूजा नागोसे मॅम,
श्री.सागर जोशी, इत्यादी मान्यवर उपस्थित होते..
ह्या कार्यक्रमात जवळपास त्या शाळेतील 250 मुलींनी सहभाग नोंदवीला होता. उपस्तिथ सर्व मुलींना सानिटरी पॅड वाटप करण्यात आले..ह्या उल्लेखनीय कार्यक्रमाचे आयोजन श्री.अमित दास सर यांनी केले आणि आभार श्री.राजेंद्र नारनवरे सर यांनी मानले..
आपल्या प्रतिक्रिया द्या....