आमदार म्हणतात नाट्यगृहाकरीता त्यांचेकडे भरघोस निधी आहे.मग ते स्वतः भूखंड का उपलब्ध करीत नाहीत ? मंथन करण्याजोगा सवाल.
*कारंजा* : नागरिकांना रोजच्या ताणतणावातून,विरंगुळा हवा.म्हणून विविध कला व संस्कृती करीता त्यांचेकरीता सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे मनोरंजन अत्यावश्यक असते.म्हणूनच महाराष्ट्र शासनाद्वारे खास असा शासनाचा सांस्कृतिक विभाग कार्यरत असून,विशेष म्हणजे मंत्रालयात सांस्कृतिक मंत्र्याचे पद देखील आहे.कलावंत हे मनोरंजनासोबतच,शासनाच्या आणि राष्ट्रीय कार्यक्रमाची जनजागृती व जाहिरात करीत असतात.त्याबरोबरच आपल्या कलेद्वारे वाईट रूढी,प्रथा चे खंडन करीत व व्यसनाच्या विळख्यातून समाजाला जागरूक करीत असतात.परंतु कारंजेकरांच्या दुदैवाने कारंजा शहरात,कलेला प्रोत्साहन देण्याकरीता,नवोदित कलाकारांच्या निर्मिती करीता आणि कलाकारांना तालिम आणि प्रयोग करण्याकरीता त्यांना त्यांच्या हक्काचे सांस्कृतिक सभागृह आणि व्यासपिठच, कलानगरी कारंजा शहरात उपलब्ध नाही.व कोणताच नेता आणि आमदार त्याकरीता उत्साही नाही.हे कारंजेकरांचे दुदैवच म्हणावे लागेल.गेल्या वर्षानुवर्षे कारंजेकर कलावंताची सांस्कृतिक सभागृहांची मागणी आहे.त्याकरीता आजतागायत अनेक संस्था आणि कलाकारांनी अनेकवेळा मागण्याही केलेल्या आहेत.परंतु स्थानिक आमदारच उत्साही नसले तर सभागृह होणार तरी कसे ? गेल्या दोन महिन्यांपूर्वी स्थानिक विदर्भ लोककलावंत संघटना,ईरो फिल्मस् एन्टरटेन्टमेन्ट,अविष्कार बहुउद्देशिय संस्था,आदर्श जय भारत सेवाभावी संस्था आणि अभा नाट्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी,आमदार राजेंद्र पाटणी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन, सांस्कृतिक सभागृहाची मागणी रेटून धरली असता,आमदार राजेंद्र पाटणी म्हणाले, "सभागृह बांधकामाकरीता माझे जवळ भरपूर निधी आहे.तुम्ही फक्त भूखंड दाखवा.मी निधी उपलब्ध करून लगेच देतो." त्यांच्या या उत्तराने कलाकारांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, "आम्ही तळागाळातील गोरगरीब कलावंत भूखंड कोठून खरेदी करणार ?" अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. ह्या सार्वजनिक कामाकरीता भूखंड उपलब्ध करून देणे हे शासनाचे काम आहे.आमदार राजेंद्र पाटणी हे शासनकर्ते आहेत.त्यांनी कलाकाराच्या सार्वजनिक मागणीची दखल घेऊन एकतर स्वतःच भूखंड उपलब्ध करून किंवा शासनाच्या निधीमधून खरेदी करून द्यायला हवा आहे. तसेच या संदर्भात नगर पालिकेकडे भूखंडाची मागणी केली असता,मुख्याधिकारी नगर परिषद कारंजा हे म्हणतात.नगर पालिकेकडे भूखंड नाही.परंतु आज रोजी १) नगर पालिकेचा जुना मानवी दवाखाना असलेला भूखंड, २) पूर्वी भगवान महावीर बालोद्यान असलेला भूखंड, ३) बायपास वरिल प्रस्तावित नियोजीत नगर पालिका इमारतीचा भूखंड कारंजा शहरात धूळ खात पडलेले आहेत.कारंजा नगर पालिका येथे १) नगर पालिकेचा मानवी दवाखाना, २) भगवान महावीर बालोद्यान आणि ३) नगर पालिकेची इमारत ही बांधकामे देखील करीत नाही. त्यामुळे हे भूखंड अडगळीत पडल्या प्रमाणे पडले आहे तेव्हा या भूखंडाचे श्रीखंड तर खाल्ले जाणार नाही ना ? असा प्रश्न कारंजेकर सर्वसामान्यांना पडत आहे. नगर पालिका भूखंडाचे काही का होईना पण आता आमदार या नात्याने,आमदार राजेंद्र पाटणी यांनी दखल घेऊन, सांस्कृतिक सभागृहाचा प्रश्न येत्या सार्वत्रिक निवडणूकांपूर्वी सोडवावा अन्यथा निवडणूकीत कलाकारांना मतदान करतांना "नोटा" चा पर्याय निवडावावा लागणार असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया कलावंता मधून उमटत आहेत.