वाशिम : राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड हे आज १० फेब्रुवारी रोजी वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.
दुपारी ४ वाजता वनोली, ता. महागांव जि. यवतमाळ येथून वाशिमकडे प्रयाण करतील. सायंकाळी ५.३० वाजता शासकीय विश्रामगृह येथे येतील. सायंकाळी ६ वाजता जिल्हा क्रीडा संकुल येथे सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य महासंचालनालय व जिल्हा प्रशासन वाशिम यांच्या समन्वयातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित "जाणता राजा"महानाट्य कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर यवतमाळकडे प्रयाण करतील.