दिनांक 24/04/2022 ला डॉ. आंबेडकर विद्यालय ब्रम्हपुरी येथे चंद्रपूर जिल्हा कुस्तीगीर संघ व ब्रम्हपुरी तालुका कुस्तीगीर संघाचे संयुक्त विद्यमाने विदर्भ केसरी अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत पदकप्राप्त कुस्तीगीरांचा सत्कार समारंभ चंद्रपूर जिल्हा कुस्तीगीर संघांचे अध्यक्ष मा. शरदजी टेकूलवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या थाटात यशस्वीतेने संपन्न झाला.
दीप प्रज्वलित करून व खाशाबा जाधव यांचे प्रतिमेला माल्यार्पण करुन सत्कार समारंभाची सुरवात करण्यात आली. श्री राजेश सोलापन उपाध्यक्ष जिल्हा कुस्तीगीर संघ.मा.विलासजी विखार बांधकाम सभापती नगर परिषद ब्रम्हपुरी.मा. क्रिष्णाभाऊ सहारे उपाध्यक्ष ब्रम्हपुरी तालुका कुस्तीगीर संघ.श्री शिवराजजी मालवी स्विमिंग नॅशनल चॅम्पियन व पत्रकार ब्रम्हपुरी.मा. श्री. सुयोगजी बाळबुध्दे प्राचार्य पॉलिटेक्निक महाविद्यालय बेटाळा मा.श्री. कांबळे सर मुख्याध्यापक डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालय ब्रम्हपुरी.श्री मोंटुजी पिलारे सामाजिक कार्यकर्ते श्री येरमेजी मंडळ अधिकारी ब्रम्हपुरी.श्री शेकोकार सर प्राध्यापक नेवजाबाई हितकारणी महाविद्यालय ब्रम्हपुरी व अॅड.श्री आशिष गोंडाणे यांची समयोचित कुस्तिगिरांना मार्गदर्शनपर भाषणे झाली.
डॉ.शिरीषजी वंजारी यांनी पदक प्राप्त कुस्तीगीरांना आर्थिक मदत देतं धनादेशाचे वितरण केले तर जिल्हा कुस्तीगीर संघा तर्फे पदक प्राप्त पैलवानांना मासिक मानधन सुरु करण्यात आले तसेच ब्रम्हपुरी कुस्तीगीर संघांचे प्रशिक्षक श्री. विनोदजी दिवटे यांचा जिल्हा कुस्तीगीर संघा कडून शाल व श्रीफळ देतं सत्कार करण्यात येऊन मासिक मानधन सुरु करण्यात आल्याने सर्व उपस्थित पैलवानांनी जिल्हा कुस्तीगीर संघांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सुनिल भोयर जिल्हा कुस्तीगीर संघाचे हितचिंतक यांनी केले.कार्यक्रमाचे संचालन कविता घोरमोडे व आभार प्रदर्शन अमोल ठेंगरी यांनी केले.सत्कार सोहळा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ब्रम्हपुरी तालुका कुस्तीगीर संघाचे पदाधिकारी नरेंद्र गाडगिलवार व प्रशिक्षक श्री विनोद दिवटे, विनित मेश्राम व कुस्तीगिरांनी अथक परिश्रम घेतले .
पदकप्राप्त कुस्तीगीरांचा सत्कार:-
तनु मुकेश जाधव -59 किलो-सुवर्णपदक विजेती.
जयंत विलासराव समर्थ 54 किलो- कांस्यपदक विजेता सुचिता रविंद्र ठेंगरे 63 किलो- कांस्यपदक विजेती. यांना रोख रक्कम, टि- शर्ट, लोअर , शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह सत्कार करण्यात आला.