देसाईगंज तालुक्यातील जंगलात वाघ, बिबट व अस्वल यासारख्या हिंस्त्र प्राण्यांचा वावर आहे. त्यामुळे एकटे-दुकटे जंगलाच्या रस्त्याने कुणी प्रवास करीत नाही. रात्रीचा तर प्रवास धोकादायक ठरतो. अशातच रात्री चारचाकी वाहनधारकांना गांधीनगर-सावंगी मार्गावर तडस दिसून आला. तडस अचानक समोर येताच वाहनधारकांची घाबरगुंडी उडाली. तडस हा पाहायला लहान जरी असला तरी तो हिंस्र व मांसाहारी प्राणी आहे. त्याचा बाइट फोर्स वाघापेक्षाही अधिक असल्याचे वन्यजीव अभ्यासक सांगतात.