कारंजा(लाड) : वाशिम जिल्ह्यातील कारंजा (लाड) तालुक्यातील स्थानिक सहारा कॉलनीतील संतोषी माता महिला भजनी मंडळाचे सर्व महिला सदस्य दर एकादशीला सकाळी 6 वाजता सहारा व कोहिनुर कॉलनी येथे असलेले श्री.गजानन महाराज मंदिर,श्री जगदीश्वर मंदिर व श्री हनुमान मंदिर या सर्व मंदिर परिसराध्ये साफसफाई करून स्वच्छता मोहीम राबवित आहेत.तसेच या परिसरात पावसाळ्यात लावलेल्या झाडांना पाणी देऊन त्यांची निगा राखीत आहेत.मोझरी येथील अ.भा.श्री गुरुदेव सेवा मंडळाशी हे मंडळ संलग्नित आहे.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या ग्रामगितेमध्ये साफसफाई,स्वच्छता,आरोग्य
सेवाभाव,सामुदायिक प्रार्थना यांचे महत्व सांगितले आहे.
त्यामुळे या विचाराने प्रत्येक्षात कृतीची जोड देऊन हे मंडळ सेवाभाव रुजविण्याचे काम करीत आहेत.याच बरोबरच या परिसरातील विविध ठिकाणी भजन सेवा देऊन त्यात महाराजांची भजने गाऊन संत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करीत आहेत.मंडळाच्या अध्यक्षा सौ आशा व्यवहारे यांनी सांगितले की गेल्या एक महिन्यापासून दर एकादशीला ही मोहीम आम्ही या परिसरात राबवित आहोत, यापुढेही ती निरंतर आम्ही राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.याकरिता आम्हाला अखिल भारतीय श्री.गुरुदेव सेवा मंडळाचे वाशिम जिल्हा सेवाधिकार सुनीलभाऊ दशमुखे,संतोष दादा केळकर कारंजा(लाड)शहर सेवाधिकारी रामबकस काका डेंडुळे भजन प्रमुख दामोदर जोंधळेकर सौ.ज्योतिताई,उगले,वाशिम जिल्हा महिला सेवाधिकारी सौ.सीमाताई सातपुते सौ.छायाताई गावंडे इत्यादी श्री.गुरुदेव सेवा मंडळातील मंडळींचे मार्गदर्शन लाभत आहे.असे वृत्त अ.भा.श्री.गुरुदेव सेवा मंडळाचे वाशिम जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विजय खंडार यांनी कळविले आहे .