तळोधी ( बाळापूर):-
कैलास सत्यार्थी फाऊंडेशन नवी* दिल्ली पुरस्कृत बालविवाह प्रतिबंधक जनजागृती दिप जलाओ अभियान नोबल पारीतोषीक विजेते आदरणीय कैलास सत्यार्थी यांच्या प्रेरणेतून आज दिनांक १६ऑक्टोबर २०२२रोजी संपूर्ण भारतभर घेण्यात आले.

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी, नागभिड, व सिंदेवाही तालुक्यातील २५ पेक्षा अधिक गावांमध्ये स्व.रूख्माबाई पाल बहूउद्देशिय शिक्षण संस्था वर्धा चे सचिव श्री. हरीश्चंद्र पाल यांचे मार्गदर्शनाखाली बालविवाह प्रतिबंधक दिपजलाओ रैली चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात गावातील सरपंच, पोलीस पाटील, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी शिक्षिका, अंगणवाडी सेविका, बचतगटांचे पदाधिकारी, महीला सदश्य, तरूण मुलेमुली, अनेक शाळकरी मुले, व गावांतील प्रतिष्ठीत व्यक्तींना सामावून घूण्यात आले होते, बालविवाह प्रतिबंधक दिपजलाओ रैली चे प्रत्येक गावातील मुख्य रस्त्यां वरून आयोजन करण्यात आले होते.बालविवाह हा देशावरील कलंक असून तो नष्ट झालाच पाहीजे. या आत्मविश्वासांने ग्रामस्थ या रैलीत हातामध्ये जळती मेणबत्ती, बालविवाहाचे संदेश देणारे रंगीत पोस्टर्स, तसेच नोबल पारीतोषिक विजेते आदरणिय कैलासजी सत्यार्थी यांचा संदेश पत्रके आणि बैनर्स* घेवून सहभागी झाले होते, रैलीत "आगे बढ़ेंगे और जितेंगे!", "बालविवाह है कुप्रथा है, बेटी के लिए एक विपदा है! " कच्ची उम्र में मत करो ब्याह, दोनो का जिवन होगा तबाह!","गाव गाव पहूचना है, बालविवाह रुकाना है!"* या सारख्या अनेक घोषणांनी आसमंत दणाणून गेले होते, तर गावातील चौकाचौकात गावक-यांना, बालविवाह करू नका, मुलींना शिकू द्या* अशी प्रतिज्ञा देण्यात आली इतकेच नव्हे तर *आम्ही बालविवाह समारंभात सहभागी होणार नाहीत व बालविवाह थांबविण्यासाठी पुर्ण प्रयत्नशील होवू, बालविवाहाची माहीती मिळाल्यास गावातील पोलीस पाटील, पोलीस विभाग व बालसंक्षक्षण कक्षाला कळवू* अशीही शपथ देण्यात आली.
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी तालुक्यातील रामपूरी, तुकूम, नागभिड तालुक्यातील बोंड,राजोली, येनोली, सोनूली, सिदेवाही तालुक्यातील कळमगांव, गन्ना, कुकडहेटी, नवेगाव, लोनखैरी, नवेगाव, टोला, चिटकी, राजोली, आंबोली इ.२५ हून अधिक गावात या रैली चे आयोजन करण्यात आले होते.
दिवे उजळून साजरा केला जाणारा दिवाळीचा सण जरी आठ दिवस पुढे असला तरी ग्रामस्थांना या दिपजलाओ रैली ने दिवाळीचा आगळावेगळा आनंदअनुभवायला मिळाला होता. महाराष्ट्र राज्यात हणमंत बारबले,रमेशजी कुटे यांच्या नेतृत्वाखाली सदर बालविवाह प्रतिबंधक दिपजलाओ जनजागृती अभियान* आयोजित केले होते.
चंद्रपूर जिल्ह्यातील नवेगाव लोनखैरी येथील कार्यक्रमात चंद्रपूर जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या समुपदेशिका कु.प्रिया,पिंपळशेंडे,तर सामाजिक कार्यकर्त्या प्रतीभा मडावी* यांची तर कळमगांव गन्ना येथे राष्ट्रीय स्तरीय तंबाखू मुक्त भारत पुरस्कार व राज्यस्तरीय राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती कार्यकर्ता पुरस्कारांनी गौरविलेले हरीश्चंद्र पाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
या अभियानाचे यशस्वीतते साठी संस्थेच्या कार्यकर्त्या श्रीमती सुरेखा चन्नोडे, श्रीमती वर्षा पिलारे, श्रीमती शारदा गावतूरे, श्रीमती कामीनी कामडी, सौ पाकमोडे, सौ,शिल्पा मेश्राम, तसेच बाल संरक्षण कक्षाच्या समुपदेशिका प्रिया पिंपळशेंडे आणि सामाजिक कार्यकर्त्या प्रतीभा* यांचे परीश्रम फळाला आले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....