दिवसानगीक आधुनिक तंत्रज्ञान विकसित होत असून यात आता आणखी एक वेगळी भर पडली आहे चेन्नई येथील गरुडा यारो स्पेस कंपनीच्या ड्रोन मधून कंपनीच्या वतीने चक्क ! रनमोचन गावातील प्रगतशील शेतकरी पांडुरंग प्रधान यांच्या शेतात ड्रोन उडवून औषधी फवारणीचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले, सदर गरुडा यारो स्पेस ड्रोन विषयी शेतकऱ्यांना माहिती व्हावी यासाठी ही प्रत्यक्षीक करून दाखवण्यात आली. सदर ड्रोनचे वजन १४ किलोग्राम असून त्यामध्ये दहा लिटर औषध मिसळ- विन्यासाठी दहा लिटरची टँक बनवण्यात आली आहे जवळपास हा ड्रोन २४ किलो पर्यंत वजन घेऊन हवेतून धान पिकावर व इतर पिकांवर फवारणी करतो. सदर ड्रोन हा गुगल मॅप वर चालत असून त्यात जीपीएस, कॅमेरा, देण्यात आला असून रिमोटवरून त्याची फवारणी केली जाते कंपनीतर्फे गणेश हेटवार ( पायलट) विनोदमस्करे प्रात्यक्षिक करून दाखवत आहेत. याची किंमत जवळपास पाच लाख रुपये सांगण्यात येत आहे. त्यात 50 टक्के शेतकऱ्यांना सबसिडी आहे. तर प्रोडूसर कंपन्या व इतर कृषी विभागाच्या कंपन्यांना 75 टक्के सबसिडी देण्यात येते एक एकर शेतीमध्ये दहा लिटर पाणी टँकर मधून पाच मिनिटात ही फवारणी केली जात असून सदर ड्रोन ची बॅटरी केवळ पंधरा मिनिटे चालत असल्याची माहिती प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली
यावेळी. प्रोडूसर कंपनीचे मंगेश दोनाडकर, विश्वनाथ तोंडरे, पांडुरंग प्रधान, विजय दोनाडकर, चंद्रलाल सहारे, विनोद दोनाडकर, महेश प्रधान
सुदर्शन गुरुनुले, रमेश ठाकरे, गंगादास पिलारे, मुन्ना प्रधान, यांच्यासह बरेच प्रगतशील शेतकरी उपस्थित होते