ब्रम्हपुरी- आरमोरी मुख्य महामार्ग वैनगंगा नदिघाट पुलाजवळ अज्ञात इसमाचा मृतदेह वैनगंगा नदीपात्रात तरंगताना आढळल्याची घटना आज दिनांक:-६/६/२०२२ ला सकाळीं ८: ००वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
आज सकाळी ८:०० वाजताच्या सुमारास ब्रम्हपुरी आरमोरी मुख्यमहामार्गावर आवागमन करीत असलेल्या प्रवाशांना वैनगंगा नदिपात्रात एक अज्ञात इसम पाण्यावर तरंगत दिसला.
सद्या वैनगंगा नदीपात्रातील पाण्याची पातळी दोन दिवस वाढली आहे. त्यामुळे पाण्याचा प्रवाह वाढला असल्याने अज्ञात इसमाचा मृतदेह हा पाण्यावर तरंगत जात असतांना नदीपात्रात असलेल्या झुडपाना अज्ञात इसमाचा मृतदेह अडकला होता.
घटनेचे माहिती संबधित पोलिस विभागाला देण्यात आली लगेच संबधित ब्रम्हपुरी पोलिस विभागाची चमू घटनास्थळी दाखल होउन मृतदेह वैनगंगा नदिपत्राच्या बाहेर काढण्यात आले. घटनेची ही माहिती प्रसार माध्यमाद्वारे प्रकाशित करण्यात आली होती. तेंव्हा नागभिड तालुक्यातील उसराळ मेंढा गावातील बेपत्ता इसमाच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती मिळाली की वैनगंगा नदीपात्रात एका इसमाच मृतदेह पाण्यात तरंगत असताना दिसले आहे. कुटुंबातून बेपत्ता इसम असेलेल्या कुटुंबीयांनी पोलिस विभाग ब्रम्हपुरी येथे भेट देत पोलिस अधिकारी यांना माहिती देवू लागले की माझ्या कुटुंबातून एक वयोवृद्ध इसम दिनांक :-५/६/२०२२ पासून घरी आलेला नाही.त्या इसमाची ओळख पटावी म्हणून आधार कार्ड व फोटो सोबत आणला आहे. तेव्हां मृतक इसमाची ओळख पटावी म्हणून आणलेली आधार कार्ड व फोटो हे मृतक इसमाला तंतोतंत जुळल्याने मृतक इसम हा नागभिड तालुक्यातील उसराळ मेंढा गावातील नत्थु तुळशीराम शेंदरे वय वर्षे ६० असे आहे.
मृतक नत्थु च्या पच्छात्य कुटुंबात पत्नी मुलगा,सून, व नातवंड असा आप्त परीवार असल्याची माहिती पोलिस विभागाकडून प्राप्त झाली आहे.
मृतक नत्थु चा मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे नेण्यात आले.
आत्महत्या करण्याचे कारण अजुनही कळू शकले नसून घटनेचा पुढील तपास श्री.रोशन यादव ठाणेदार ब्रम्हपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली मेंडकी पोलिस विभागाचे कर्मचारी करीत आहेत