कारंजा(लाड) : आईवडील मुलीबाळींना जन्म देतात.मुलगी असली तरी तिला मुलापेक्षा जास्तच प्रेम करतात.माया लावतात.मुलींना रणचंडीणी, लक्ष्मी,नवदुर्गा,स्त्रीशक्ती,नारी शक्ती म्हणून संबोधतात.त्यांना हवे तसे शिक्षण देण्याकरीता धडपडतात.त्यांचे लालनपालन करतांना,मुलींचे हवे ते लाड पुरवितात.परंतु हे सर्व उपकार विसरून,मुलींचे घरातून,शाळा महाविद्यालयातून,आपल्या गावातून अदृश्य होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून,अनेकवेळा काही मुलींचा अनैसर्गीक मृत्यु किंवा हत्या झाल्याचा समाचार मिळतो.तर काही वेळा अज्ञान मुलिंनी आंतरजातिय विवाह केल्याचे वृत्त मिळते.तर काही वेळा मुलींना परत आणण्याचा प्रयत्न जरी आईवडिल आणि पोलिस विभागाने केला तरी सुद्धा ह्या मुली संमोहित झाल्याप्रमाणे, "त्यांनी जे काही केलं.ते प्रेम केलं आता आईवडिलांकडे जायचे नाही." आम्ही केलंय तिचं पूर्वदिशा असल्याचे जवाब देऊन, त्यांचेवर प्रेमाच भुतं असल्याच दर्शवीत,प्रत्यक्ष जन्मदात्या आईवडिलांसोबतचे ऋणानुबंध तोडायलाही मागेपुढे पहात नाहीत.मात्र आईवडिलांना दुखवून,सामाजिक विद्रोह करून ह्या मुली भविष्यात केव्हाच सुखी राहू शकत नाहीत.एकदा का जीवापाड प्रेम करणाऱ्या आई वडिलांच्या निःस्वार्थ मायाममता प्रेमाची प्रतारणा करून ह्या मुली आईवडिलांना दुखवून निघून गेल्यात.तर भविष्यात यांच्या सुखदुःखात आईवडिलांचा आधार,त्यांची छत्र छाया त्यांना मिळूच शकत नाही.त्यामुळे भविष्यात त्यांचे आयुष्य संपूर्ण जीवन त्यांनी एकाकीपणानेच जगावे लागते.हे कटूसत्य आहे.ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे.वास्तविक यामध्ये दोष मुलींचा आहे.असे मला म्हणायचेच नाही ? तर दोष असतो त्यांना फुस लावणाऱ्या मुलांचा.आणि असी फुस लावणारी मुलं संस्कारी असूच शकत नाहीत. त्यामुळे मुलींनी आई वडिलांच्या मर्जीविरुद्ध जाऊन इतर मुलांच्या किंवा मुलांनी सुध्दा इतर मुलीच्या फुसलावण्याला बळी पडूच नये.आपल्या भारतिय संस्कृती आणि संस्कारामध्ये विवाह संस्थेला अनन्य साधारण असे महत्व आहे.व त्यातही येथे मुलाच्या किंवा मुलीच्या आईवडिलांनी जुळवून दिलेले विवाह ग्राह्य मानल्या जात असतात. आज चित्रपट,दूरदर्शन वाहिन्यांवरील मालिका आणि त्यांच्या हातातील मोबाईल. फेसबुक,इन्स्टाग्रॉम,व्हॉटसपचा वापर,या इलेक्ट्रॉनिक्स समाजमाध्यमाच्या निरर्थक वापरामुळेच मुलींचे अदृश्य होण्याचे प्रमाण वाढले आहे.असे म्हटले तर वावगं ठरणार नाही.त्यामुळे प्रत्येक आई वडीलांनी व कुटूंब प्रमुखाने आपल्या मुलामुलीच्या भ्रमणध्वनीच्या (मोबाईलच्या) वापरावर लक्ष्य केन्द्रित केलं पाहीजे.त्यांच्या मोबाईल मध्ये किती सिमकार्ड आहेत ? त्यामध्ये किती बॅलन्स असतं ? आपली मुलंमुली यांच्या मोबाईलची संपर्क यादी,त्यांचे मित्र मैत्रीणी कोण कोणते ? ते मोबाईलचा वापर कशाप्रकारे करतात ? व्हॉटस एप,फेसबुक,इन्स्ट्राग्राम,ट्विटर वर किती वेळ रहातात ? कोणते चित्रपट,मालिका पहातात ? याकडे जर लक्ष्य दिले तर निश्चितच मुलामुलीचे अदृश्य होण्याचे आणि मनमानी करीत घरातून पळून जाण्याचे आणि दुसऱ्या मुलामुलीच्या बंधनात अडकण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.केव्हाही टाळी एका हाताने वाजत नाही.त्यामुळे मुलामुलींना प्रेमाने माया ममतेने विश्वासात घेऊन त्यांचेवर चांगले संस्कार घडविल्या गेले.तर कोणत्याच प्रकारच्या अनर्थ घटना निश्चितच होणार नाही.व मुलामुलींचे अदृश्य होण्याचे,पळून जाण्याचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी होईल.नव्हे नव्हे अशा घटनाच घडणार नाहीत.असे प्रबोधन विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष,महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त संजय कडोळे यांनी केले आहे.