अकोला:- अखिल भारतीय भोपे परिषद रजिस्टर नंबर 590 यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सन 2024 मध्ये राष्ट्रपुरुष थोर व्यक्ती जयंती व राष्ट्रीय दिन साजरी करण्याबाबत परिपत्रकात यंदा भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिनानिमित्त जयंती कार्यक्रमांमध्ये नव्याने समावेश केला आहे. यासाठी नागपूर येथील सामाजिक कार्यकर्ते श्री हरिहर पांडे यांनी शासनाकडे यशस्वी पार पुरवठा केला त्यामुळे महाराष्ट्र शासनाने 27 डिसेंबर 2023 आणि 18 जानेवारी 2024 रोजी परिपत्रक निर्गमित केले. राज्यात तीन टक्के देशात दीड कोटी आणि जगभरात कोट्यावधी संख्येने असणाऱ्या महानुभाव पंथीय साधकांसह मराठी सारस्वताने ही या शासन निर्णयाचे स्वागत केले आहे उपरोक्त विषयांवे व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद आयुक्त, महानगरपालिका यांनी त्यांच्या अधिनस्त सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये भाद्रपद शुद्ध द्वितीया गुरुवार 5 सप्टेंबर 2024 रोजी भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन जयंती कार्यक्रम साजरा करण्यासंदर्भात अंमलबजावणी करण्याची निर्देश द्यावेत ही विनंती करण्यात आली आहे. सदर पत्रक निर्गमित करण्यामागे भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे जीवन उद्धारक विचार सर्वांपर्यंत पोहोचवावे हा शासनाचा विचार आहे शासकीय कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन अखिल भारतीय भोपे परिषद व त्यांचे प्रतिनिधी मंडळ महानुभाव व्यक्ती संस्था संघटना यांचे प्रतिनिधींना सहभागी करून घ्यावे महानुभाव पंथ प्रवर्तक परब्रम्ह परमेश्वर अवतार भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे तत्वज्ञान मानवतावादी कार्य अलौकिक साहित्य आणि सामाजिक योगदानाची माहिती संपूर्ण विश्वाला करून देण्याकरिता आम्ही सहकार्य करण्यास उत्सुक आहोत यावेळी निवेदन देताना सुभाष किसनराव वाईनदेशकर, प्रकाश मानेकर, सुधाकरराव बिडकर, डॉ.दिनेश बिडकर, संदीप दिगंबर शेवलेकर, दिगंबर भिकाजी शेवलेकर, गोपाल माणिक धुळेकर, शुभम विनोद शेवलेकर, अभिजीत नंदकिशोर शेवलेकर, आळसपुरकर, विशाल तायडे, जयराज पंजाबी, संतोषराव शहापूरकर, विनोद कपाटे, नंदकिशोर शेवलेकर ,रूपेश सालकर . प्रकाश लाड, उदरभरे, अंकुल नेरकर,
अमोल लाड.वश्रीक्षेत्र बा. टाकळी पुजारी बांधव सहभागी झाले होते.