चंद्रपूर, : रब्बी पणन हंगाम 2024-25 मधील शासकीय आधारभूत किमत खरेदी योजनेअंतर्गत धान / भरडधान्य खरेदी करीता शेतकरी नोंदणीला 31 मे 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मागील हंगामाच्या तुलनेत चालू हंगामामध्ये अत्यंत अल्प प्रमाणात शेतकरी नोंदणी झाल्यामुळे तसेच शेतकरी नोंदणीपासून कोणीही वंचित राहू नये, म्हणून शेतकरी नोंदणी करीता सदर मुदत वाढ देण्यात आली आहे.
तरी धान/ भरडधान्य उत्पादक शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर जाऊन मुदतीत ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी व्ही. एस. तिवाडे यांनी केले आहे.
असे आहेत खरेदी केंद्र : 1) विविध कार्यकारी सहकारी संस्था राजोली (ता. मूल), 2) मुल कृषी उत्पन्न बाजार समिती मुल, 3) चंद्रपुर जिल्हा कृषी औद्यो. सहकारी संस्था चिमुर, 4) चिमूर तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री नेरी (ता. चिमूर), 5) सेवा सहकारी संस्था मर्या, अंतरगाव (ता. सावली), 6) चंद्रपुर कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपुर, 7) तालुका शेतकी खरेदी विक्री सह. संस्था सिंदेवाही, 8) नवरगाव सहकारी राईस मिल नवरगाव, (ता. सिंदेवाही), 9) सिंदेवाही सहकारी भात गिरणी सिंदेवाही, 10) कृषी उत्पन्न बाजार समिती सिंदेवाही, 11) सेवा सहकारी संस्था रत्नापुर (ता. सिंदेवाही), 12) तालुका शेतकी खरेदी विक्री सह. संस्था नागभीड, 13) श्री. गुरुदेव सहकारी राईस मिल कोर्धा, (ता. नागभीड), 14) कृषी उत्पन्न बाजार समिती नागभीड, 15) चंद्रपुर जिल्हा कृषी औद्योगिक सह. संस्था ब्रम्हपुरी, 16) चंद्रपुर जिल्हा कृषी औद्योगिक, सहकारी संस्था बरडकिन्ही (ता. ब्रम्हपुरी), 17) ब्रम्हपुरी खंड सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्था ब्रम्हपुरी, 18) कान्हा धान्य उत्पादक कृषक सहकारी संस्था मर्या. माहेर (ब्रम्हपुरी) आणि 19) कृषी उत्पन्न बाजार समिती पोंभुर्णा.