कारंजा : कारंजा ते दारव्हा मार्गावर येणारा सोमठाण्या जवळील वळणाचा घाट हा आधीच सोहळ अभायारण्य प्रकल्पामध्ये येत असल्यामुळे, आजुबाजूला वन विभागाचे जंगल आहे आणि त्यामुळे या रस्त्याने नेहमीच जंगली श्वापदे जसे की, रानडुक्कर- रोही- निलगायी- हरीणाचे परिसरात कळपच्या कळप दृष्टिस दिसून येत असतात. शिवाय ही जंगली श्वापदे अचानक वाहनांवर आदळल्याने किंवा आडवे गेल्याने नेहमीच येथे जीवघेण्या अपघाताच्या घटना होत असतात. त्यामुळे ह्या परिसरातून प्रवास करतेवेळी वाहनचालकाने सतर्कता ठेवूनच गाडीचा वेग कमी ठेवून प्रवास करायचा असतो. मात्र तरीही दक्षता न घेताच ,कोणत्याही प्रकारचा संयम, सतर्कता, वेग नियंत्रण न ठेवता , घाटाची जाणीव न ठेवताच दुचाकी-चारचाकी वाहने धावत असतात. त्यामुळे दि . ११ नोहेंबर रोजी, आपल्या दुचाकीने कारंजाहून हातोल्याकडे गावी जाणाऱ्या तुकाराम चव्हाण वय वर्ष ५० याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यु झाल्याची घटना आज रोजी घडल्याचे वृत्त प्राप्त झाले आहे.