कारंजा (लाड)(जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : निसर्गापुढे माणसाला हतबल व्हावेच लागते. त्याला कारणीभूतही मानवच आहे.पन्नास वर्षापूर्वी आम्ही पंधरा पंधरा दिवसाची सततधार (झडं),पावसाळ्याच्या चारही महिन्यात समाधानकारक असा पाऊस होतांना बघत होतो. त्याकाळी शेतजमीनी मध्ये प्रत्येकाला अपेक्षापेक्षा जास्त आणि चांगले धान्यही होत असते. कधीकाळी दुष्काळ पडला तरीही देशात मुबलक धान्य असायचे. परंतु आता परिस्थिती ऋतूमान आणि हवामानही पूर्णतः बदललेले आहे. त्याला कारणही मानवजातच आहे. वाढत्या लोकसंख्येमळे बागायती कृषक जमिनीची संख्या कमी होऊन, सिमेंटची निवासस्थाने आणि रस्ते महामार्गाचे जाळे वाढतच आहे. नद्यांचे प्रवाह बदलले जात आहेत.धरणाने नद्या कोरड्या होऊन केवळ धरणापुरता पाणीसाठा रहात असून,इतर नद्या,नाले,जुने तलाव आणि विहीरी नष्ट झाल्या आहेत. जामिनितीलं झऱ्यांची दिशा बदललेली आहे.प्रचंड जंगलतोड होऊन जंगलातील लाखो करोडो झाडे नष्ट होत आहे. पर्यावरणामध्ये रासायनिक प्रदूषनाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.अवकाशात मानवी हस्तक्षेप वाढल्याने अवकाशात,ढगामध्ये प्रदूषण होतच आहे.आणि यामुळे दिवसेंदिवस दुष्काळ किंवा अतिदुष्काळाचे सावट घोंघावत आहे.आम्ही म्हणजे पत्रकार किंवा हवामान अभ्यासक पावसाचे केवळ अंदाज व्यक्त करीत असतो. केव्हा हे अंदाज 100 % अचूक ठरतात.तर केव्हा 100 % चुकतात.मात्र यामध्ये आमचाही काही दोष नसतो. कारण आम्ही म्हणजे परमेश्वर तर नाहीच ना ? शेवटी मानवाला निसर्गापुढे हतबल व्हावेच लागते. त्यातही महत्वाचे म्हणजे महासागरामध्ये निर्माण होणारी मोठमोठी वादळे. ही वादळे मान्सूनची दिशा बदलविण्याचे वाईट कृत्य करीत असतात. त्यामुळे जेथे शासकिय यंत्रणांचे आणि वेधशाळेचे अंदाज चुकतात.तेथे आमच्या सारख्या सामान्य माणसाचे अंदाज हे अंदाजच असतात.आणि त्यातही महत्वाचे म्हणजे यावर्षी अल निनोचा प्रभाव . . ! परंतु आम्ही दिनांक 13 जुलै रोजी बातमीपत्रा मधून,दि 13 जुलै पासून, "कोकणातून पाऊस विदर्भाकडे वळला ... विदर्भात रेड अलर्टच इशारा . . भाग बदलवीत समाधान कारक पाऊस पडणार . " हे भाकीत *दैनिक विश्वजगत* मधून वर्तविले होते.आणि आमचा, प्राप्त माहितीनुसार तो अंदाज अचूक ठरल्याचेच दिसून येत आहे. कारण गेल्या 13, 14, 15 जुलै पासून,पाऊस बरसत आहे.आता आमचे मित्र रुई गोस्ता ता मानोरा, जि अमरावती येथील हवामान अभ्यासक गोपाल गावंडे यांचे माहिती प्रमाणे, येत्या सोमवार दि 17 जुलै व मंगळवारी दि 18 जुलै रोजी मुसळधार पावसाचा अंदाज त्यांनी व्यक्त केला असून, दि .23 नंतरच्या आठवड्यातही चांगला पाऊस होणार आहे. आम्ही बघतो आहे की,आज विदर्भातील अनेक धरणे जलसाठयाने भरू नये म्हणून विदर्भातील अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग केल्या जात आहे.सध्या बऱ्याच प्रमाणात पेरण्या आटोपत आलेल्या असून, पावसामुळे बळीराजा समाधान व्यक्त करीत आहे. कृपया अनुचित घटना टाळण्या करीता,पाऊस जास्त असल्यास प्रवाशांनी आपली वाहने नदी, नाले, त्यावरील पुल, खाचखडग्याचे रस्ते यामधून टाकू नये. सावधान बाळगावी. ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट होत असल्यास, झाडांचा आसरा घेऊ नये. शेतातील शेतकरी शेतमजूर यांनी व गुराख्यांनी आपली जनावरे पावसाच्या अंदाजानुसार, पाऊस सुरू होण्यापूर्वी घरी आणावी. शेतातील किंवा गावातील विजेच्या खांबाजवळ उभे राहू नये. त्याला स्पर्श करू नये. असे आवाहन या बातमी पत्राद्वारे करण्यात येत असल्याचे महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेच्या वतीने अध्यक्ष संजय कडोळे यांनी केले आहे.