वाशिम : प्रखर हिंदूत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेना ( शिंदे गट) वाशिम शहरप्रमुखपदी डॉ. विशाल सोमटकर यांची नियुक्ती करण्यात आली. वाशीम येथे जन शिक्षण संस्थेच्या सभागृहात आयोजीत कार्यक्रमात शिवसेना नेत्या विदर्भ कन्या आ. भावना गवळी यांनी 14 एप्रिल रोजी डॉ. सोमटकर यांना नियुक्तीपत्र देवून ही जबाबदारी सोपविली.
काँग्रेस पक्षात युवक काँग्रेस शहराध्यक्ष ते काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष आदी जबाबदाऱ्या सांभाल्यानंतर पक्षातील वर्चस्ववादाला कंटाळून त्यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ़ठी देवून आ. भावनाताई गवळी यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबई येथील कार्यक्रमात शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर त्यांच्या शेकडो समर्थकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने शिवसेनेला बळकटी मिळाली. त्यांच्यातील नेतृत्व गुणची पारख करीत आ. भावना गवळी यांनी 14 रोजी त्यांच्या खांद़यावर शहरप्रमुख पदाची जबाबदारी सोपविली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून पक्षात नवचैतन्य संचारले आहे. डॉ. सोमटकर यांच्यातील संघटन कौशल्य व दांडग्या जनसंपर्काचा शिवसेनेला आगामी काळात निश्चितच फायदा होईल. असा अंदाज राजकीय जानकार व्यक्त करीत आहेत. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय खानझोडे, महादेवराव ठाकरे, संजय भुतेकर,गजानन भुरभुरे, किशोर देशमुख्, मनीष गहुले, प्रकाश महाले, अनिल गरकळ, अमृतराव गोरे, युवा सेनेचे रवी भांदुर्गे, पंकज इंगोले, अनील भडके, रामेश्वर काटेकर, शाम खरात, लक्ष्मण गावंडे, नागेश घोपे, सतीश डुबे, गोपाल लव्हाळे, राहूल देशमुख तसेच शिवसेनेचे आजी, माजी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ़या संख्येने उपस्थित होते.