कारंजा : स्थानिक जे सी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आणि आर .जे .चवरे हायस्कूल व कॉन्व्हेंट आयोजित सात दिवसीय विज्ञान संस्कार शिबिराचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.
या विज्ञान संस्कार शिबिरामध्ये कारंजा तालुक्यातील वेगवेगळ्या शाळेतील जवळपास 120 विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित सर्व मान्यवरांनी पहलगाम येथील पर्यटन स्थळी शहीद झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली दिली. त्यानंतर उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे बिंटेलिजनट, नागपुर चे संस्थापक डॉ. संकेत जोशी, सर , तसेच विज्ञान भारती देवगिरी प्रांत चे जॉईंट सेक्रेटरी श्री .श्रीपाद कुलकर्णी सर, तसेच विज्ञान भारतीचे सदस्य, श्री. मंदार जयंतराव नाझर प्रोफेसर या सर्वांचा परिचय श्री. पाडर सरांनी करून दिला. त्यानंतर जे. सी. हायस्कूलचे व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. हरसुले सर ,माजी मुख्याध्यापक श्री.नांदगावकर सर ,आर.जे.चवरे प्राथमिक व हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ .चोपडे मॅडम,आर.जे.चवरे काॅन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका सौ.हेडा मॅडम जे .सी हायस्कूलचे पर्यवेक्षक श्री गंधक सर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, भेटवस्तू , सन्मानचिन्ह देऊन प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमात प्रियंका तायवाडे मॅडम यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी विज्ञान भारतीची प्रार्थना व णमोकार मंत्र सादर करून कार्यक्रमाची पवित्र सुरुवात केली. या प्रार्थनेतून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानविषयक श्रद्धा, जिज्ञासा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्याचा सुंदर संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात
श्रीपाद कुलकर्णी सर यांनी
आपल्या मार्गदर्शनात विज्ञान भारती द्वारे घेण्यात येणाऱ्या शिबिराबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आपल्या भारतीय संस्कृतीची मुळे विज्ञानाशी घट्ट जोडलेली आहेत. भारत देश 'सोने की चिडीया' म्हणून ओळखला जायचा आणि आपण पारंपारीक विज्ञानाचा योग्य वापर करून अनेक वैश्विक यशे मिळवली आहेत. सर चंद्रशेखर व्यंकट रमण यांना मिळालेला नोबेल पुरस्कार आणि इतर भारतीय वैज्ञानिकांचा जागतिक स्तरावरचा मोलाचा सहभाग त्यांनी उदाहरणाद्वारे उलगडून दाखवला.
त्याचप्रमाणे श्री श्रीपाद कुलकर्णी सर यांनी त्यांच्या भाषणात विज्ञान संस्कार शिबिराचे विशेष वैशिष्ट्य जसे की प्रत्येक प्रयोगानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधून वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करणे, लहान-सहान प्रयोगांद्वारे वैज्ञानिक संस्कृती रुजवणे इत्यादी बद्दल मार्गदर्शन केले.
या नंतर प्रमुख पाहुणे डॉ. संकेत जोशी सरांनी पावर पॉइंट प्रेझेंटेशन द्वारे AI बदल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा इतिहास त्याची सुरुवात आणि आर्टिफिशल इंटेलिजन्स चे दैनंदिन जीवनात विद्यार्थ्यांना व सर्वसामान्यांना होणारे फायदे सांगितले. आर्टिफिशियल इंटेलिजन्स चे सध्याच्या युगात प्रत्येक क्षेत्रात असलेले महत्त्वाचे स्थान विद्यार्थ्यांना विविध उदाहरणाद्वारे स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रबद्ध संचालन श्री. वैभव पांडे यांनी केले. कार्यक्रमाचा समारोपीय भाषणात श्री गंधक सर यांनी सात दिवस शिबिराचे आयोजन कसे होणार आहे याबद्दल माहिती दिली .कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व शिक्षक तसेच कारंज्यातील सहभागी शाळांच्या शिक्षकांचे आभार मानण्यात आले.विज्ञान संस्कार शिबिराचा पहिला दिवस हा ज्ञान, श्रद्धा आणि विज्ञानप्रेम यांचा एक सुंदर संगम ठरला.
आपल्या प्रतिक्रिया द्या....