वाशिम : राज्यशासनाच्या सांस्कृतिक कार्य संचलनालयाकडून, "कला हेच जीवन" समजून जातीवंत व पारंपारिक तसेच इतरही कलाकारांचा महासन्मान म्हणून त्यांच्या वृद्धापकालिन उदरनिर्वाहा करीता,राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यीक कलाकार योजनेमार्फत दर महा पाच हजार रुपये मानधन दिले जाते.मात्र सन 2019 च्या विधानसभा निवडणूकां पासून जिह्यात दोन पालकमंत्र्यांनी निवड समितीचे गठनच केलेले नव्हते.परंतु सन 2024-25 मध्ये जिल्हाधिकारी वाशिम यांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्याच्या समितीचे गठन करण्यात येवून, मागील पाच वर्षातील कलाकाराचे मानधनाचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी दि. 04 मार्च ते 10 मार्च पर्यंत कलाकाराच्या प्रत्यक्ष मुलाखती व सादरीकरण होऊन, जिल्हाधिकाऱ्याचे अध्यक्षते खालील समितीने त्यापैकी अंदाजे 241 कलावंताची मानधन लाभार्थी म्हणून निवड करून, त्यांची यादी समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद यांचेकडून पुढील कार्यवाही साठी,सांस्कृतिक संचालनालयाकडे पाठवीली आहे.परंतु तरीसुद्धा गेल्या सहा महिन्यापासून, ह्या नव्याने निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्याच्या खात्यात मानधन मिळाले नसल्याने,मानधनाच्या आशेवर असलेले वयोवृद्ध तसेच दुर्धर आजारग्रस्त कलावंत मानधनाची प्रतिक्षा करीत असल्याने, शासनाने त्यांना लवकरात लवकर मानधन देण्याची मागणी, कलावंताच्या वतीने,जिल्ह्यातील अग्रणी असलेल्या, विदर्भ लोककलावंत संघटने कडून अध्यक्ष संजय कडोळे यांनी लावून धरली आहे.