ब्रम्हपुरी नगर परिषदेकडून शहरात मुबलक पाणी पुरवठा करण्यात येत आहे. उन्हाळयात नागरिकांना जास्त प्रमाणात पाणी लागत असते त्यामूळे नागरिक नळाला अवैधपणे टिल्लुपंप लावून पाणी घेत असल्याने शहरात कृत्रीम पाणी टंचाई निर्माण करीत असतात. अश्या अवैधपणे टिल्लुपंप लावून पाणी घेणाऱ्याचे टिल्लुपंप जप्तीची कारवाई करण्यात येत असल्याचे कचरा घंटागाडीद्वारे प्रत्येक प्रभागात दररोज ध्वनीक्षेपन सुध्दा करण्यात येत आहे. न.प. पाणी पुरवठा विभागचे अधिनस्थ कामगार व कर्मचारी यांची टिल्लुपंप जाती टिम तयार करुन शहरातील विविध प्रभागात टिल्लुपंप जप्ती मोहिम राबविण्यात येत आहे. नळ सुटण्याच्या वेळात सदरची टिल्लुपंप जप्ती टिम जावून नळांची तपासणी करीत असून अवैधपणे नळाला लावलेले टिल्लुपंप जप्ती करण्यात येत आहेत. आतापर्यंत 30 नळ कनेक्शन धारकाकडून अवैधपणे टिल्लुपंप लावून पाणी घेत असल्याने त्यांचे टिल्लुपंप कायमचे जप्ती करण्यात आले आहे. जप्ती करण्यात आलेल्या नळ कनेक्शन धारकांवर रु. 2000/- दंड आकारण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. ज्यांनी दंड भरला नाही त्यांचे नळ कनेक्शन बंद करण्याची कार्यवाही लवकरच सुरु करण्यात येत आहे. करीता नागरिकानी नळाला अवैधपणे टिल्लुपंप लावून शहरात कृत्रीम पाणी टंचाई निर्माण करु नये, नागरिकांनी त्याचे आजुबाजूस कुणी अवैधपणे टिल्लुपंप लावून पाणी घेत असल्याचे निर्देशनास आल्यास नगर परिषद ब्रम्हपुरी पाणी पुरवठा विभागाशी संपर्क साधावा अथवा दुरध्वनी करुन माहिती द्यावी. माहिती देण्याऱ्याचे नांव गोपनिय ठेवण्यात येईल.असे आवाहन मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांनी प्रसिद्धी पत्रात केले आहे