कारंजा मानोरा मतदार संघात महायुती-महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीमध्येच होणार तिरंगी लढत.सद्यस्थितीत तिन्ही पक्षांची स्थिती तुल्यबळाची.* "निवडणूक मैदानातील ४३ उमेद्वारापैकी १६ उमेद्वाराची माघार तर सद्यस्थितीत एकूण २७ उमेद्वार निवडणूक रिंगणात "
कारंजा (लाड) : गेल्या दहा वर्षापासून भाजपा पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघातील विद्यमान आमदार स्व. राजेंद्र पाटणी यांच्या मृत्युनंतर होत असलेल्या विधानसभा निवडणूकीमध्ये महायुती म्हणजेच भाजपामध्ये पाटणीपुत्र किंवा भाजपाच्याच जिल्ह्यातील एखाद्या नेत्याला उमेद्वारी मिळेल अशी मतदारांची अपेक्षा असतांना महायुतीने ऐन वेळी भाजपाच्या निष्ठावंताना डावलून ऐन वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महिला सभापती श्रीमती सईताई डहाके यांना भाजपामध्ये प्रवेश देवून उमेद्वारी दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.तर महाविकास आघाडीने देखील मतदार संघ राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे गेला असतांना घटक पक्षातील नेत्याला उमेद्वारी न देता भाजपा मधून आलेल्या नवख्या अँड. ज्ञायक राजेंद्र पाटणी यांनी उमेद्वारी जाहीर केली.शेवटच्या क्षणापर्यंत ही उमेद्वारी काँग्रेसच्या सुनिल बाबासाहेब धाबेकर यांनाच मिळेल अशी मतदाराची अपेक्षा असतांना महाविकास आघाडीने देखील धक्कातंत्र वापरून अँड.ज्ञायक पाटणी यांना उमेद्वारी जाहीर केली. तसेच श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने देखील उमेद्वार बदलवीण्यात मागे न राहता ऐनवेळी आपला उमेद्वार बदलून आपल्या पक्षाची उमेव्दारी लोकनेते सुनिल पाटील धाबेकर यांना जाहीर केली.कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघात महायुती-महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी या तिनही पक्षाचे दिग्गज कार्यकर्ते आणि मतदार असून सर्वच पक्षांनी निष्ठावंताना डावलून उमेद्वाराची अदलाबदल केल्यामुळे पक्षनिष्ठ कार्यकर्ते आणि मतदार मात्र संभ्रमात पडलेले आहेत.याबाबत महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतले असता निष्ठावंत कार्यकर्त्यांनी सांगीतले की, "खरेतर आजपर्यंत आमचे संपूर्ण आयुष्य ज्या पक्षात गेले त्या पक्षाच्या उमेद्वाराला उमेद्वारी मिळाली नसल्यामुळे आम्ही संभ्रमात असून आमची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाल्याचे आम्हाला वाटत आहे. ज्या नेत्याशी (उमेद्वाराशी) आम्ही एकनिष्ठ आहोत त्याच नेत्या सोबत रहावे की आम्ही वर्षानुवर्षे राहत असलेल्य पक्षासोबत रहावे असा पेच आमचे समोर पडला आहे.परंतु आता कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाच्या आजतागायत रखडलेल्या विकासासाठी व्यक्तीनिष्ठ होऊन आम्हाला मार्ग काढावा लागणार आहे.कारंजा मानोरा विधान सभा मतदार संघात हिंदु धर्मियांची आणि जैन धर्मियांची अनेक तिर्थस्थळे असतांना आणि जगभरातून पर्यटक येथे येत असतांनाही येथील तिर्थक्षेत्र पर्यटन विकास आराखड्यानुसार कोणताही विकास झालेला नाही.हे शल्य अनेक मतदारांना बोचत असून येथील तिर्थस्थळ आणि सोहोळ काळविट अभयारण्याचा विकास झाला असता तर येथील अनेक ग्रामिण आणि कारंजा शहरातील लोकांना लघुव्यवसाय उपलब्ध झाले असते.शिवाय योजनामहर्षी स्व.बाबासाहेब धाबेकर आमदार असतांना त्यांनी शासनाकडून मंजूरात मिळवून आणलेली एमआयडीसी सुरु झाली असती तर कदाचित लहान मोठे उद्योग कारखाने होऊन काही प्रमाणात तरी येथील बेरोजगारांच्या हाताला रोजमजूरी मिळाली असती. त्याखेरीज उच्चशिक्षणाच्या सोई सुविधा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन अशी अनेक विकास कामे येथे रखडलेली आहेत.त्यामुळे कारंजा मानोरा मतदार संघाची जबाबदारी स्विकारून विकास घडविणाऱ्या काळजीवाहू विधानसभा सदस्याच्या नेतृत्वाची येथे अत्यंत गरज आहे.सध्या निवडणूक रिंगणात असलेल्या उमेद्वाराकडून मतदारांना अनेक अपेक्षा आहेत.या मतदार संघात होणाऱ्या निवडणूकीचे वैशिष्ट्य म्हणजे महायुती-महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी या तिनही पक्षाचे उमेद्वार हे दिवंगत आमदारांचे राजकिय वारस असून त्यांना मतदार संघाचा चांगलाच अभ्यास आहे. शिवाय मतदार संघात ही मंडळी येथील मतदाराच्या सुखंदु:खात सहभागी होणारी असल्यामुळे त्यांचे येथे कार्यकर्ते आणि मतदार देखील मोठ्या प्रमाणात आहेत.हे तिघेही उमेद्वार तुल्यबळ असल्यामुळे येथे होणारी निवडणूक या तिन उमेद्वारा मध्येच तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच निवडणूक रणमैदानात २७ उमेद्वार असले तरी जागरूक मतदार निवडून येणाऱ्या उमेदवारालाच मतदान करतात.आपले अमूल्य मत वाया जाणार नाही याची दक्षता प्रत्येक मतदार घेत असल्याने प्रमुख उमेद्वारालाच मतदान होते हा आमचा अनुभव आहे. प्रत्यक्ष निवडणूकीत मतदानानंतर होणाऱ्या निकालावरच येथील जनतेचा कौल कुणाला ? महायुतीला-महाविकास आघाडीला की वंचित बहुजन आघाडीला हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आपल्याला आधी मतदानाची व नंतर निकालाची वाट पहावी लागणार आहे एवढे मात्र निश्चित.