ब्रम्हपुरी :- चौगान सेवा सहकारी संस्थेची अध्यक्ष / उपाध्यक्ष पदाकरीता दिनांक ११/४/२०२२ ला निवडणुक पार पडली असून अध्यक्ष पदाकरीता दिवाकर बक्षी मातेरे तर उपाध्यक्ष पदाकरीता सुनिता खेमराज तिडके यांची अविरोध निवड करण्यात आली.
१३ मार्च २०२२ ला सेवा सहकारी संस्था चौगान संचालक मंडळाची निवडनुक संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात सहकार क्षेत्रात चर्चेचा विषय ठरला तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष खेमराज तिडके यांच्या करीता हि निवडणूक प्रतिष्ठेची होती. विरोधी पक्षाने खालच्या पातडीवर जाऊन अपप्रचार केला व गावात अंशातता पसरवण्याचे पुरेपूर प्रयत्न केले. परंतु मोठ्या पोलिस बंदोबस्तात निवडणूक पार पडली व १३ पैकी १३ जागेवर दुप्पट मताच्या फरकाने सर्व उमदेवार विजयी झालेत. पंकज तिडके यांचे नेतृत्वात व खेमराज तिडके यांच्या मार्गदशनाखाली हि निवडणुक पार पडली असून सलग सहाव्यांदा चौगान सेवा सहकारी संस्थेवर झेंडा फडकविण्यात यश आला. यावेळी आभार कार्यक्रमास खेमराजजी तिडके अध्यक्ष, तालुका कांग्रेस कमिटी ब्रम्हपुरी, अनिलभाऊ पिलारे माजी अध्यक्ष सेवा सहकारी संस्था चौगान, देवरावभाऊ नखाते, जगदीश नाकतोडे, बाळुभाऊ चहांदे, अभिमनजी नाकतोडे, रेवनाथ भुते, महादेव फुलझले, शामराव चहांदे, मनोहर शिवनकर, राजीराम लिंगायत, प्रदीप पाटील मैंद सुधाकरजी गडे, मोरेश्वरजी पारधी, दिनेश शिवनकर, कार्तिक नन्नावरे, दामोधर भागडकर, प्रकाश सहारे, पंकजभाऊ तिडके, रमेश पाटील मैंद इसन बुराडे. इ. उपस्थित होते.