कारंजा (लाड) :-
महाराष्ट्र राज्यातील कापूस उत्पादक चळवळीचे प्रणेते, निव्वळ शेतकर्याच्या हिताकरीता आयुष्य वेचणारे शेतकर्याचे कृषी सहकार शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील शिस्तप्रिय असलेले अग्रगण्य नेते, भारतातील पहिल्या,कृषी व सहकार क्षेत्रातील दि.अकोला-वाशीम जिल्हा सहकारी बँकेच्या प्रगतीचे शिल्पकार,सहकारमहर्षी कै.डॉ.वा.रा. कोरपे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवा निमित्त शुभारंभ कारंजा (लाड) येथील मुख्य शाखेत मोठ्या थाटामाटात पार पडला.

यासंबधी वृत्त असे की, सदर्हू कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी,ज्येष्ठ सहकार नेते तथा दि.अकोला-वाशिम मध्यवर्ती सहकारी बॅक लि अकोलाचे उपाध्यक्ष मा.श्रीधरजी पाटील कानकिरड हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून कै.वा रा उपाख्य अण्णासाहेब कोरपे यांचे तत्कालिन जुने जाणते एकमेव सहकारी मा.तुळशीरामजी मुंधरे (रा.गिर्डा),माजी नगराध्यक्ष मा.जेठूसेठ उपाख्य नरेंद्रजी गोलेच्छा,माजी नगराध्यक्ष मा. बटूकसेठ उपाख्य अरविंदजी लाठीया,बँकेचे माजी संचालक मा.प्रभाकरराव वानखडे,मा.सौ. आशाताई कृ.गाडगे,मा.विश्वनाथ पाटील ताथोड,तसेच बँकेचे मार्केटिंग ऑफिसर (ग्रेड-1) मंगेश काळे आणि कारंजा मुख्य शाखा-व्यवस्थापक दत्तात्रय चौधरी उपस्थित होते.

याप्रसंगी सर्वप्रथम मा.श्रीधर पाटील कानकिरड व उपस्थित मान्यवरांनी दिपप्रज्वलन करून,कै.वा.रा.उपाख्य अण्णासाहेब कोरपे यांच्या प्रतिमेचे पूजन-हारार्पण व अभिवादन करून जन्मशताब्दी महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आल्याचे जाहीर केले.याप्रसंगी माजी नगराध्यक्ष अरविंदजी लाठीया,विश्वनाथजी पाटील ताथोड,नरेंद्रजी गोलेच्छा यांनी आपल्या संभाषणातून कै अण्णासाहेबांच्या अविस्मरणीय जीवन कार्याला उजाळा दिला तर अध्यक्षीय भाषणामधून बोलतांना सहकारनेते मा.श्रीधर पाटील कानाकिरड यांनी सांगीतले की, "सहकार महर्षी कै अण्णासाहेब यांचे सहकार व कृषी क्षेत्रातील योगदान हे जिल्ह्यापुरते मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे ते कैवारी होते.त्यांचे संपूर्ण जीवन केवळ ग्रामिण भागातील शेतकरी बांधवाकरीता समर्पित होते.आपल्या आयुष्यात त्यांनी वेळेला महत्व देत राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी,सहकारी साखर कारखाना,सुतगिरणी शेतीविकास व सहकारी बँकेच्या प्रगतीकरीता लावून दिलेली कडक शिस्त आजच्या पिढी करीता निश्चितच प्रेरणादायी ठरणारी आहे.त्यामुळे त्यांच्या जीवनकार्याचा ठसा प्रकर्षाने जाणवत आहे.त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून आपण कृषी असो वा सहकार प्रत्येक क्षेत्रात शेतकरी विकासासाठी कार्यरत राहीलं पाहीजे.

या अविस्मरणीय अशा शुभारंभ सोहळ्याला संपूर्ण कारंजा तालुक्यातील सर्व सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष व संचालक,सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,सदस्या, जिल्हा परिषद शिक्षक पतसंस्थेचे संचालक,बँकेचे सभासद,शेतकरी,नागरिक,बॅकेचे ग्राहक, पत्रकार बहुसंख्येने उपस्थित होते.या यशस्वी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मार्केटिग ऑफिसर (ग्रेड-1) मंगेश काळे यांनी करतांना बॅकेच्या यशस्वितेच्या लेखा जोखा मांडला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व्यवस्थापक दत्तात्रय चौधरी,आभारप्रदर्शन शुभम काकड यांनी केले असल्याचे वृत्त कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रत्यक्षदर्शी महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....