वाशिम : महिला व अंधश्रद्धा या विषयांवर आर. ए. कॉलेज महिला विभाग येथे आज दि. 07 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती वाशिम जिल्हा कार्याध्यक्ष तथा अशासकीय जादूटोणा विरोधी कायदा प्रचार आणि प्रसार अंमलबजावणी समितीचे पी एस खंदारे यांचा व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.
यावेळी अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. आर.एफ.पगारीया, प्रा. डॉ. पी. एस.पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. आर.जी. मस्के प्रा. डॉ. अर्चना वाटाणे, प्रा. जे एस. जोशी, प्रा. डॉ. एस.एस. सोनोने, प्रा. डॉ. आर. आर. पाचोरी, प्रा. डॉ. एस.पी. कुमारे आदींची उपस्थिती होती.
पि.एस. खंदारे यावेळी म्हणाले की, आधुनिक महिला ह्या प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करतात, शैक्षणिक क्षेत्रात देखील पहिल्या क्रमांकाने ह्या मुलीच उत्तिर्ण होतात. तरी सुध्दा अंगात येण्याचे प्रमाण पुरूषांच्या संख्येने महिला मध्ये जास्त असल्याचे विविध दाखले देत महिलानी अंधश्रद्धा झुगारून सदसद्विवेकबुद्धी जागृत ठेवावी व वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करून विवेकवादाची मशाल घेऊन समाजात व कुटूंबात ज्ञानाचा उपयोग करावा अनिष्ट प्रथा, परंपरा व चाली रिती झुंगारुन जिवन जगण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाला मुलींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार आर.ए. कॉलेज च्या महिला विभागाच्या मुलींनी केले. असे वृत्त महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी कळविले आहे .