कारंजा : कारंजा येथून जवळच असलेल्या ग्राम यावर्डी येथील बाबासाहेब धाबेकर माध्यमिक विद्यालयात दिनांक 22 जुलै रोजी दुपारी एक वाजता शाळेचे मुख्याध्यापक विजय भड यांच्या अध्यक्षते खाली विद्युत सुरक्षा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यशाळेला अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक विजय भड, प्रमुख अतिथी म्हणून गावच्या उपसरपंचा सावित्रीताई मडके, संस्थेचे संचालक देविदास काळबांडे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र अमरावतीचे उपकार्यकारी अभियंता विनय बोळे व कनिष्ठ अभियंता अजय बनसोड उपस्थित होते.
कार्यशाळेच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजन व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात कनिष्ठ अभियंता अजय बनसोड यांनी आपल्या घरात असणाऱ्या विद्युत संदर्भात कशी काळजी घ्यावी? घरातील अर्थिंग कसे करावे? त्यांचे फायदे व विद्युत बटणे कोणती वापरावीत? जेणेकरून आपल्याला विद्युत मुळे नुकसान होणार नाही याबाबत मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र अमरावतीचे उपकार्यकारी अभियंता विनय बोळे यांनी विद्यार्थी जीवनात विद्युत पासून आपले संरक्षण कसे करावे? घराबाहेर खेळताना तसेच घराच्या स्लॅप वर खेळताना, पतंग उडवताना कोणती काळजी घ्यावी? तसेच विद्युत वापरताना पावसाळ्यात घडणाऱ्या संभाव्य घटना याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. अध्यक्षिय भाषण शाळेचे मुख्याध्यापक विजय भड यांनी विद्युत विषयी इतके सुंदर आणि सखोल मार्गदर्शन केल्याबद्दल दोन्हीही मार्गदर्शकांचे संस्थेच्या वतीने आभार मानले.
सदर कार्यशाळेचे संचलन गोपाल काकड, प्रास्ताविक राजेश शेंडेकर तर आभार अनिल हजारे यांनी मानले. यावेळी वर्ग आठ नऊ व दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते.