ब्रह्मपुरी शहरातील आरमोरी मार्गावरील अमराई येथे बसचा थांबा देण्याची मागणी येथील परिसरातील नागरिकांनी व दलित मित्र प्रा. डी. के. मेश्राम यांनी केली आहे.
ब्रह्मपुरी शहरातील पेठ वार्ड, कृष्णा कॉलनी ,स्टेट बँक कॉलनी येथील नागरिकांना नागपूर गडचिरोली येथे विविध कामानिमित्त रोजच जावे लागते . शहरातील ख्रिस्तानंद चौक, शिवाजी चौक ते आमराई या मार्गावर आटो चालत नसल्याने येथील प्रवाशांना बस पकडण्याकरिता रोजच दोन किलोमीटर पायी अंतर कापत धावपळ करावी लागते. पेठ वार्ड परिसरात रेल्वे स्टेशन असल्याने रेल्वेने प्रवास करणारे प्रवासी व आरमोरी, गडचिरोली ,नागपूर या ठिकाणी जाणारे प्रवाशी आमराई येथे बसची वाट पाहत असतात. मात्र आमराई येथे बस थांबा नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे .येथून बसणाऱ्यांची प्रवासी संख्या पाहता आमराई येथे बस थांबा देण्याची मागणी दलित मित्र प्रा. डी. के. मेश्राम व परिसरातील नागरिकांनी यांनी केली आहे.