कारंजा :- महाविकास आघाडीने उमेद्वारीपासून लोकनेते सुनिल पाटील धाबेकर यांना डावलून ऐनवेळी त्यांच्यावर अन्याय केल्यामुळे महाविकास आघाडीच्या सर्वच जाती धर्मातील स्थानिक कार्यकर्त्यामध्ये आणि लोकनेते सुनिल पाटील धाबेकर मित्र मंडळामध्ये आपल्यावर आपल्याच पक्षश्रेष्ठींनी अन्याय केला असल्याची भावना निर्माण झाली.म्हणून कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघातील स्थानिकचे नेते आणि कार्यकर्ते तसेच धाबेकर समर्थकांनी सुनिल भाऊ धाबेकर यांना निवडणूक लढविण्याचा आग्रह धरून त्यांनी आपला उमेद्वारी अर्ज दाखल करावा अशी मागणी केली होती.त्यामुळे अखेर आपल्या सर्वधर्मिय समर्थक कार्यकर्त्याच्या विनंतीला मान देऊन सुनिल पाटील धाबेकर यांनी आज दि. 28 ऑक्टोंबर रोजी आपली अपक्ष उमेद्वारी दाखल केला होता.परंतु त्यानंतर श्रध्देय प्रकाश आंबेडकर यांनी लोकनेते सुनिल पाटील धाबेकर ह्यांच्या सोबतचा सर्वधर्मिय समाजाचा प्रचंड गोतावळा लक्षात घेऊन त्यांच्या माध्यमातून कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघावर निर्विवाद विजय संपादन केला जाऊ शकतो.हे सत्य स्विकारून ऐनवेळी आपल्या आधी दिलेल्या उमेद्वाराची समजूत काढून, कारंजा मानोरा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक नेत्यांच्या आग्रहास्तव सुनिल पाटील धाबेकर यांची उमेद्वारी जाहीर केली. सुनिल पाटील धाबेकर यांच्या उमेद्वारीने १००% विजय खेचून येणार असल्यामुळे त्यांचे कडे सर्वधर्मिय मतदारांनी एकच गर्दी करीत शक्ती प्रदर्शन केले. त्यानंतर उपविभागीय कार्यालयावर जाऊन लोकनेते सुनिल पाटील धाबेकर यांनी वंचित बहुजन आघाडी कडून आपला उमेद्वारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांना मिळालेला जनता जनार्दनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून कारंजेकरांना सन 1994 मध्ये योजनामहर्षी स्व.बाबासाहेब धाबेकर यांनी नारळाचे झाड या निवडणूक चिन्हावर लढविलेल्या निवडणूकीची आठवण झाली. व यावेळी यंदा त्या निवडणूकीची पुनरावृत्ती निश्चितच होणार असल्याचा विश्वास अनेकांनी बोलून दाखवीला.वंचित बहुजन आघाडीचे पाठबळ मिळाल्यामुळे लोकनेते सुनिल पाटील धाबेकर यांची ताकद वाढलेली आहे त्यामुळे म्हणून यंदाची निवडणूक चुरशीची होणार असून मतदार संघात तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रसंगी कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघातील सर्वच जातीधर्म समाजाचे प्रमुख नेते,
कार्यकर्ते आणि मतदारांची लक्षणीय उपस्थिती दिसून येत होती. असे वृत्त आमचे प्रतिनिधी प्रदिप वानखडे यांनी कळवीले आहे.