गडचिरोली जिल्हा काँग्रेस जिल्हा प्रमुख लारेन्स गेडाम यांनी कोरची तालुक्यातील बेतकाटी, बोटेकसा, बेतकाटीटोला, भीमपूर, सोहले, विटेकला, या गावातील कार्यकर्ते व जनतेची भेट देऊन त्या परिसरातील कांग्रेसचे जेष्ठ नेते व गडचिरोली जिल्हा कांग्रेस कमिटीचे महासचिव हकीम उद्दीन शेख, जिल्हा परिषद माजी सदस्या प्रमिलाताई काटेंगे, ग्रामपंचायत बिटेकसा चे माजी सरपंच जगदीश कपोरडेरिया, महेशजी नरोटे,अजयजी कल्लो, श्री. मानपुरे सर, व पुढारी न्यूज टीव्ही चॅनलचे प्रतिनिधी आशिष अग्रवाल यांच्याशी चर्चा करून कोरची या तालुक्यातीलच्या विभागातील जनतेच्या विविध समस्या जाणून घेतल्या.
त्यासोबतच येणाऱ्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत कांग्रेस पक्षाला संघटनात्मक बाबीवर चर्चा करून पक्ष मजबुती करिता व येणाऱ्या निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीकोनातून काय काय प्रयत्न करणे आवश्यक आहे. यावर सकारात्मक चर्चा करून कोरची तालुक्यातील जनतेच्या समस्या जाणून घेतल्या