गडचिरोली, (जिमाका) दि.05 : मौजा- मर्दीनटोला जंगल परिसरात, पोलीस मदत केंद्र गॅरापत्ती, पोलीस स्टेशन कोरची अंतर्गत दिनांक 13.11.2021 रोजी गडचिरोली जिल्हा अंतर्गत, पोलीस पथक नक्षल शोध मोहिम राबवित असतांना मर्दीनटोला जंगल परिसरात पोलीस व नक्षल चकमकीदरम्यान गोळीबारात ऐकवीस (21) पुरुष व सहा (06) महिलांचे मृतदेह सापडल्याने मा. जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांनी सदर मृतदेहाच्या मृत्यूचे कारण तपास करणेकामी सदर प्रकरणात फौजदार प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 176 अन्वये चौकशी करण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी, कुरखेडा यांची नियुक्ती केली आहे. सदर घटनेशी संबंधितांचे बयाण घेण्याची कार्यवाही सुरु आहे. उक्त घटनेमध्ये मृत पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांकडून मय्यत व्यक्तींची ओळख पटवून घेणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने सदर घटनेत मृत पावलेल्या पुढील नमूद व्यक्तींच्या नातेवाईकांनी दिनांक 20 एप्रिल 2022 रोजी पर्यंत उपविभागीय दंडाधिकारी, कुरखेडा यांचे कार्यालयामध्ये बयाणाकरीता उपस्थित राहावे असे उपविभागीय दंडाधिकारी, कुरखेडा यांनी कळविले आहे.
मय्यत व्यक्तींची नावे- 1) मासे मडावी, रा.गचनपल्ली, ता.कोंटा, जि. सुकमा (छ.ग.). 2) संथीला, रा. पश्चिम बस्तर, जि. बिजापूर (छ.ग.). 3) कोसा ऊर्फ मुसाखी, वय 30 वर्ष, बस्तर एरिया (छ.ग.). 4) धरमु ऊर्फ मुंगु सुक्कु कलमु मद्दुम, ता.जि. बिजापूर (छ.ग.). 5) इडमा (पुरुष). 6) सोमडा ऊर्फ नरेश उईका, रा.गोंदोड, ता.जागरगुडा, जि. सुकमा (छ.ग.). 7) नेरो (महिला) वय 21 वर्ष, रा. दक्षिण माड एरिया (छ.ग.). 8) चेतन पदा ऊर्फ रतन, वय 24 वर्ष, दक्षिण बस्तर (छ.ग.). 9) अरुन ऊर्फ रामलु मडकाम, रा.पामरा भैरमगड एरिया, जि.बिजापूर (छ.ग.). 10) सन्नु ऊर्फ कोवाची, वय 24 वर्ष, रा.बस्तर एरिया (छ.ग.). 11) भुमा ऊर्फ भुमन्ना, रा. बस्तर एरिया (छ.ग.). 12) मुचाकी मुय्ये, वय 32 वर्ष, रा.रेगडगट्टा, पोस्टे, भेज्जी, ता.कोंटा, जि. सुकमा (छ.ग.). 13) लच्छु, वय 26 वर्ष, रा.बस्त्र एरिया (छ.ग.).14) शांती, रा.कुंबड, पश्चिम बस्तर, जि.बिजापूर (छ.ग.). 15) लोकेश ऊर्फ मंगु पोडयाम/मडयाम, रा.जागरगुंडा, जि.दंतेवाडा (छ.ग.).
****
आपल्या प्रतिक्रिया द्या....