तालुक्यात महाविकास आघाडी सध्या सक्रीय राजकारणात लोकांच्या पसंतीस पडला असताना महा आघाडीचा भाग असलेल्या कॉँग्रेस मध्ये अध्यक्ष पदावरून झालेला वाद चव्हाट्यावर आला आहे. याबाबत सविस्तर असे की, ज्या काळात काँग्रेसला अतिशय वाईट दिवस आले होते. अशा संकटाच्या काळात, तालुकाध्यक्ष राज चौधरी यांनी मृतावस्थेत असलेल्या कॉन्ग्रेस करीता तन मन धनाने कष्ट करून काँग्रेस उभी केली . आणि मागील लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने तालुक्यात घेतलेली आघाडी घेतली आणि उमेद्वार विजयी केला.त्यामुळे कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आलेले चैतन्य हे राज चौधरी यांच्या कामाचा भाग होता. हे 100% सत्य असून तसे तालुक्यातील कॉंग्रेस कार्यकर्ते सांगत आहेत . मात्र राज चौधरी याच्या पद मुक्त होण्याच्या कारणाने कॉन्ग्रेस कार्यकर्ते नाराज असल्याचे दिसते आणि राज चौधरी यांनी कॉंग्रेसमध्ये असलेल्या कार्यकर्त्यांत पक्षांबाबत केलेली कामे तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे .पेशाने आय टी इंजिनिअर असलेल्या राज चौधरी यांनी विद्यार्थी जीवनात कॉन्ग्रेसची एन एस यु आय, युवक कॉँग्रेस, अशा विविध आघाड्यांवर पदाधिकारी म्हणुन काम केल्याने त्यांचा तालुक्यातील संपर्क हा दांडगा आहे. उंबर्डा बाजार गावचे सरपंच असलेल्या राज चौधरी याचे पदमुक्त होणे . कॉँग्रेसला चांगलेच महागात पडणारे असल्याच्या भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहेत.
राज चौधरी पक्षाला सोडचिठ्ठी देणार?
तालुका अध्यक्ष पदावरून न सांगता कोणतेही बैठक न बोलावता स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे . या मागणीसाठी घेतलेल्या पत्रकार परिषदत आपली भुमिका ही तालुक्यातील स्थानिक उमेदवाराला महाविकास आघाडीने उमेदवारी द्यावी .अशी भुमिका घेतल्याने त्याची पक्षश्रेष्ठिनी पदावरून उचलबांगडी केली . हा सरासरी अन्याय आहे . त्यामुळे ते आपल्या कार्यकर्त्यांसह दुसर्या पक्षात जाणार असल्याची माहिती सूत्राकडून प्राप्त होत आहे. त्यामुळे तालुक्यात कॉँग्रेस पक्षात मोठी उभी फुट पडणार असल्याचे दिसते आहे. असे वृत्त संजय कडोळे यांनी कळवीले .