कारंजा लाड :-- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व वाशिम जिल्हा काँग्रेसचे प्रभारी, जनसामान्यांपर्यंत पोहोचणारे नेते देवानंद पवार यांच्या कारंजा दौऱ्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी (उद्धव ठाकरे गट) देवानंद पवार यांची सदिच्छा भेट घेतली
काँग्रेस नेते देवानंदभाऊ पवार यांच्या नेतृत्वात कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघात उभारल्या जाणाऱ्या विविध लढ्यात शिवसेना खंबीर पणे साथ देणार असल्याची ग्वाही यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिली.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख दत्ता पाटील तुरक,कारंजा मानोरा विधान सभा समन्वयक गणेश ठाकरे,पंचायत समितीचे उपसभापती देवानंद देवळे, कारंजा-मानोरा विधानसभा प्रमुख गोपाल येवतकर व कारंजा लाड शहर शिवसेनाप्रमुख गणेश बाबरे यांनी भेट घेतली.
यावेळी काँग्रेस चे निष्ठावंत व कट्टर कार्यकर्त वाशिम जिल्हा काँग्रेस सेवादल चे जिल्हा समन्वयक अँड.संदेश जैन जिंतुरकर, कारंजा (लाड) शहर काँग्रेसचे अध्यक्ष अमीर खान पठाण, तालुका काँग्रेस चे अध्यक्ष राज चौधरी, अक्षय बनसोड, विठ्ठलराव अवताडे,ॲड वैभव लाहोटी , युसुफ भाई जट्टावाले व असलम खांन उपस्थित होते.