वरोरा येथील रहिवासी असलेला तक्रारदार सोलर सिस्टिम फिटिंग चे काम करतो.सोलर सिस्टीम लावण्यासाठी डिमांड काढण्यासाठी 6000 रुपयांची मागणी सहायक अभियंता श्रीनू चुक्का यांनी तक्रारदार युवकाला केली.पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार युवकाने लाचलुचपत विभाग चंद्रपूर येथे तक्रार दाखल केली.
पोलीस निरीक्षक शिल्पा भरडे यांनी या प्रकरणी सापळा रचला व महावितरण कार्यालय वरोरा येथे सहायक अभियंता श्रीनू चुक्का याला महावितरण च्या कार्यालयात सहा हजार देत रंगे हात पकडून दिले. ही कारवाई
पोलीस उपायुक्त,पोलीस अधिक्षक ला.प्र.वि. नागपुर, मधुकर गिते, अप्पर पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नागपूर, तसेच पोलीस उपअधिक्षक, अविनाश भामरे, ला.प्र.वि. चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पोनि शिल्पा भरडे, कार्यालयीन कर्मचारी ना.पो. नरेश नन्नावरे, पो.अ. रविकुमार ढेंगळे, राकेश जांभुळकर, वैभव गाडगे व चालक सतिश सिडाम यांनी यशस्वी पार पाडली.